एक्स्प्लोर

तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी रेवंत रेड्डी विराजमान; सोनिया गांधीसह काँग्रेस पक्षश्रेष्ठी शपथविधीसोहळ्याला उपस्थित

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणात काँग्रेसनं मोठ्या थाटात विजय मिळवला आणि मुख्यमंत्रीपदाची माळ रेवंत रेड्डी यांच्या गळ्यात घातली.

Revanth Reddy CM Oath Taking Ceremony: तेलंगणाच्या (Telangana Assembly Elections 2023) मुख्यमंत्री पदी रेवंत रेड्डी (Revanth Reddy) विराजमान झाले आहेत. तेलंगणातील (Telangana) हैदराबाद (Hyderabad) येथील एलबी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी कार्यक्रमात काँग्रेस नेते रेवंत रेड्डी (Congress Leader Revanth Reddy) यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. तेलंगणाचे राज्यपाल टी सुंदरराजन यांनी काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. तेलंगणाच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी शिवकुमार यांच्यासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते. 

रेवंत रेड्डी हे तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. रेवंत रेड्डी तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री असतील. 2013 मध्ये तेलंगणाच्या स्थापनेनंतर काँग्रेस पहिल्यांदाच सत्तेत आली आहे. आतापर्यंत केवळ चंद्रशेखर राव (KCR) दोनदा मुख्यमंत्री झाले होते. मात्र, यावेळी त्याना हॅट्ट्रिक करण्यात अपयश आलं. रेवंत रेड्डींनी चंद्रशेखर रावांचं स्वप्न धुळीला मिळवलं आणि काँग्रेसकडे सत्ता खेचून आणली. 

सोनिया गांधींसोबत मंचावर पोहोचले रेवंत रेड्डी 

56 वर्षीय रेवंत रेड्डी यांनी एलबी स्टेडियममध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी कार्यक्रमात सुमारे एक लाख लोक सहभागी झाले होते. शपथ घेण्यापूर्वी रेवंत रेड्डी सोनिया गांधींसोबत खुल्या जीपमधून स्टेडियमवर पोहोचले. 

'या' आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ 

  • दामोदर राजनरसिम्हा
  • उत्तम कुमार रेड्डी 
  • भट्टी विक्रमार्क 
  • कोमाटी रेड्डी 
  • वेंकट रेड्डी 
  • सीताक्का 
  • पोन्नम प्रभाकर 
  • श्रीधर बाबू 
  • तुम्मला नागेश्वर राव 
  • कोंडा सुरेखा 
  • जुपल्ली कृष्णा पोंगुलेटी

तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवला आहे. पक्षानं 119 पैकी 64 जागा जिंकत बहुमत मिळवलं. तर बीआरएसला केवळ 39 जागांवरच विजय मिळवता आल्या. भाजपनं तेलंगणात केवळ 8 जागाच जिंकल्या आहेत.

कर्नाटकानंतर तेलंगणा हे दक्षिणेतील दुसरं राज्य आहे, जिथे काँग्रेसनं स्वतःचं सरकार स्थापन केलं आहे. तामिळनाडूमध्ये काँग्रेस द्रमुकसोबत आघाडी सरकारमध्ये आहेत. तेलंगणातील विजयाचं श्रेय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांना जातं. सुरुवातीपासूनच ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. अखेर मंगळवारी पक्षाने त्यांच्या नावाला अधिकृत मान्यता दिली आणि आज रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

अभाविपसोबत राजकारणात पदार्पण 

रेवंत रेड्डी यांचा जन्म 1969 मध्ये अविभाजित आंध्र प्रदेशातील महबूबनगर येथे झाला. रेड्डी यांनी विद्यार्थी राजकारणाची सुरुवात अभाविपपासून केली होती. नंतर त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षात प्रवेश केला. 2009 मध्ये ते टीडीपीच्या तिकिटावर आंध्रमधील कोडंगलमधून आमदार म्हणून निवडून आले. 2014 मध्ये ते तेलंगणा विधानसभेत टीडीपीचे सभागृह नेते म्हणून निवडले गेले.

रेवंत रेड्डी यांनी 2017 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, 2018 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तथापि, काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मलकाजगिरीतून तिकीट दिले, ज्यामध्ये ते विजयी झाले. 2021 मध्ये काँग्रेसने त्यांना मोठी जबाबदारी दिली आणि प्रदेशाध्यक्ष केलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊतDhananjay Munde Beed Parali : मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा, पंकजाताईंचे आभार9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
Embed widget