एक्स्प्लोर

Beed Assembly Constituency : बीड विधानसभा मतदारसंघात बंडखोरीचे सत्र! जयदत्त क्षीरसागर यांनी थोपटले पुतण्यांविरोधात दंड

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक असताना बीड विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आल्याचे बघायला मिळाले आहे.

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक असताना बीड विधानसभा मतदारसंघात (Beed Assembly Constituency) मोठा ट्विस्ट आल्याचे बघायला मिळाले आहे. जयदत्त शिरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी त्यांनी कुठलेही शक्ती प्रदर्शन केले नाही. महापुरुषांचे आशीर्वाद घेऊन आज मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी त्यांनी पुतण्या विरोधात दंड थोपटलेले दिसून आलंय.

जयदत्त क्षीरसागर यांनी थोपटले पुतण्यांविरोधात दंड

राज्यात सध्या काका पुतण्यांची लढत अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे. यात किती पुतणे आणि किती काका हे अंकगणित नाही तर केमिस्ट्री आहे. लोकांची साथ कोणी दिली, लोकांची सेवा कोणी केली, हे लोकांना आरशाप्रमाणे माहीत आहे. कोण कोण येत आहे, ते सर्वांना माहित आहे. टोलवाले, मटकेवाले, गुटखे वाले, दारू वाले, क्लब वाले, पत्त्या वाले. मी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा माणूस आहे. या शहराचा नाहीतर जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी प्रयत्नशील असेल. सत्ता हे माझं अंतिम साध्य नाही, तर साधन आहे. मूलभूत सुविधा पुरवणे हे माझे प्राधान्य आहे. अशी प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी दिली आहे. 

नुकतेच बीड विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला होता. बीड विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरला नसतानाच उमेदवारी अर्ज भरण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यामुळे बीड विधानसभा मतदारसंघात संदीप क्षीरसागर विरुद्ध जयदत्त क्षीरसागर असा संघर्ष होणार आहे. आता यात दुसरा पुतण्या डॉक्टर योगेश क्षीरसागर यांची भर पडली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेत्यांना पक्षांनी उमेदवारी देण्याचे मान्य केले आणि मग उमेदवार सुद्धा अगदी प्रचाराच्या कामाला लागले. मात्र तिकीट जाहीर होण्याची वेळ आली आणि या नेत्यांची नावे मागे पडली आणि अचानक दुसऱ्याच नेत्यांची नावे जाहीर झाली. यामुळे बीडमध्ये सगळ्याच मतदारसंघांमध्ये मोठी बंडखोरी झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

बीड जिल्ह्यात सगळ्या मतदारसंघात बंडखोरीचे सत्र

परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजाभाऊ फड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला..

गेवराई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पूजा मोरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला..

केज विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला..

आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला..

बीड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला..

माजलगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्यानेच केलेले रमेश आडसकर यांनी उमेदवारी अर्ज भरला...

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana : आजपासून 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांसाठी 5 लाख रुपयांचे मोफत उपचार
आजपासून 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांसाठी 5 लाख रुपयांचे मोफत उपचार
अमित ठाकरेंसाठी माहीमच का निवडला; मनसे अध्यक्षांनी सांगितली 'राज की बात'
अमित ठाकरेंसाठी माहीमच का निवडला; मनसे अध्यक्षांनी सांगितली 'राज की बात'
परमबीर सिंह आणि सचिन वाझेंनी मनसुख हिरेनची हत्या घडवून आणली, अनिल देशमुखांचा आरोप, म्हणाले, फडणवीसांना याची कल्पना होती
परमबीर सिंह आणि सचिन वाझेंनी मनसुख हिरेनची हत्या घडवून आणली, अनिल देशमुखांचा आरोप, म्हणाले, फडणवीसांना याची कल्पना होती
Devendra Fadnavis: मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही, जी जबाबदारी मिळेल ती पार पाडेन: देवेंद्र फडणवीस
मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही, जी जबाबदारी मिळेल ती पार पाडेन: देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Majha Vision : मनसुख हिरेनची हत्या ते मलिकांना तिकीट, फडणवीसांनी सगळंच सांगितलंAnil Deshmukh On Fadanvis : फडणवीसांच्या मनसुख हिरेनबाबतच्या आरोपांवर अनिल देशमुख काय म्हणाले?Ramesh Chennithala PC : महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत नाही, चेन्नीथलांची माहितीABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 30 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana : आजपासून 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांसाठी 5 लाख रुपयांचे मोफत उपचार
आजपासून 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांसाठी 5 लाख रुपयांचे मोफत उपचार
अमित ठाकरेंसाठी माहीमच का निवडला; मनसे अध्यक्षांनी सांगितली 'राज की बात'
अमित ठाकरेंसाठी माहीमच का निवडला; मनसे अध्यक्षांनी सांगितली 'राज की बात'
परमबीर सिंह आणि सचिन वाझेंनी मनसुख हिरेनची हत्या घडवून आणली, अनिल देशमुखांचा आरोप, म्हणाले, फडणवीसांना याची कल्पना होती
परमबीर सिंह आणि सचिन वाझेंनी मनसुख हिरेनची हत्या घडवून आणली, अनिल देशमुखांचा आरोप, म्हणाले, फडणवीसांना याची कल्पना होती
Devendra Fadnavis: मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही, जी जबाबदारी मिळेल ती पार पाडेन: देवेंद्र फडणवीस
मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही, जी जबाबदारी मिळेल ती पार पाडेन: देवेंद्र फडणवीस
डॉक्टरचाच पेशंटवर अनेकवेळा अत्याचार, बेशुद्धीचे इंजेक्शन देत अश्लील छायाचित्रेही काढली; ब्लॅकमेल करत चार लाखांची मागणी
लवकर बरं पडेल, इजेक्शन घ्या म्हणाला अन् भुलीचे इंजेक्शन देत डाॅक्टरचा महिला रुग्णावर अनेकवेळा अत्याचार; ब्लॅकमेल करत चार लाखांची मागणी
Devendra Fadnavis:  महायुती डॅमेज करायला खास प्लॅन; काँग्रेसच्या कर्नाटकातील स्ट्रॅटेजिस्टने काय सल्ला दिला? देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
महायुती डॅमेज करायला खास प्लॅन; काँग्रेसच्या कर्नाटकातील स्ट्रॅटेजिस्टने काय सल्ला दिला? देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
Devendra Fadnavis : कितीही शिव्या दिल्या, तरी देवेंद्र फडणवीस काय आहे ते लोकांना माहीत आहे, काहीही परिणाम होणार नाही : देवेंद्र फडणवीस
कितीही शिव्या दिल्या, तरी देवेंद्र फडणवीस काय आहे ते लोकांना माहीत आहे, काहीही परिणाम होणार नाही : देवेंद्र फडणवीस
Ramesh Chennithala: महाविकास आघाडीत मैत्रीपुर्ण लढत नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'भाजपने त्यांच्या मित्र पक्षांना संपवलं...'
महाविकास आघाडीत मैत्रीपुर्ण लढत नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'भाजपने त्यांच्या मित्र पक्षांना संपवलं...'
Embed widget