मोठी बातमी : मिरज विधानसभेच्या जागेवरुन मविआत पेच, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही उमेदवार, मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत
Miraj Assembly Constituency: महाविकास आघाडीत मिरज विधानसभा मतदारसंघावरून पेच निर्माण झाला आहे. मविआ मध्ये मिरज मतदारसंघ कोणत्या पक्षाने लढवायचा यावर अद्याप एकमत झालेले नाही.
Miraj Assembly Constituency : महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) मिरज विधानसभा मतदारसंघावरून (Miraj Assembly Constituency) पेच निर्माण झाला आहे. मविआ मध्ये मिरज मतदारसंघ कोणत्या पक्षाने लढवायचा यावर अद्याप एकमत झालेले नाही.त्यामुळे मिरज मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेस या पक्षामध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची चिन्हे आहेत. मिरज विधानसभा मतदारसंघात ठाकरेच्या शिवसेनेकडून तानाजी सातपुते तर काँग्रेसकडून मोहन वनखंडे यांना एबी फॉर्म देण्यात आलाय. मिरजसाठी ठाकरेच्या शिवसेनेकडून तानाजी सातपुते यांनी तर काँग्रेसकडून मोहन वनखंडे यांना अर्ज भरलाय. यामुळे आता मिरजेत सांगली लोकसभेच्या पॅटर्नची उनरावृत्ती होण्यची किंवा मैत्रीपूर्ण लढत होण्याचे संकेत मिळत आहेत.
सांगली पॅटर्नची उनरावृत्ती की मैत्रीपूर्ण लढत?
मिरज विधानसभेत खासदार विशाल पाटील यांना मताधिक्य मिळाले होते. याच जोरावर मिरज विधानसभेसाठी काँग्रेस आग्रही आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही उमेदवारीसाठी आग्रह केला गेला. त्यामुळे मिरज विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि मिरजच्या जागेसाठी काँग्रेस आजही आग्रही असून ती काँग्रेसला मिळावी, आम्ही ती निवडून आणून दाखवू, असे आमदार विश्वजीत कदम यांनी म्हटलय.
मिरज विधानसभा मतदारसंघात मोठी चुरस
मिरजसाठी काँग्रेस पक्षाकडून मोहन वनखंडेनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मिरजेत शिवसेना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीसाठी सदरची जागा घोषित करण्यात आली होती व मिरज विधानसभेसाठी तानाजी दादा सातपुते यांची उमेदवारी सुद्धा घोषित करण्यात आली होती. आज काँग्रेस पक्षाकडून मोहन वरखडे अर्ज दाखल केल्यामुळे मिरज विधानसभेत मोठी चुरस निर्माण झाली आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून तानाजी सातपुते यांनी मिरज विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना ठाकरे गटाकडून मिरजेची जागा आणि उमेदवार घोषित करण्यात आला होता .
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने लोकसभेसाठी आपला उमेदवार घोषित केल्यानंतर काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांनी निवडणूक लढवून अपक्ष म्हणून जिंकली व भाजप उमेदवार घोषित केलेल्या ठाकरे गटाला धक्का दिला. आता पुन्हा मिरजेत ठाकरे गटाकडून उमेदवार घोषित केल्यानंतर काँग्रेस कडून अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मिरज विधानसभा मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली आहे.
मिरजमध्ये तानाजी सातपुते हेच शिवसेनेचे उमेदवार- संजय राऊत
दक्षिण सोलापूर मध्ये शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हे अमर पाटीलच असणार आहेत. काँग्रेसचा उमेदवारांना कुठल्याही प्रकारचा एबी फॉर्म अद्याप दिलेला नाही. काही ठिकाणी काही उमेदवारांनी एबी फॉर्म भरले असतील मात्र त्या एबी फॉर्म पक्षाची मान्यता नाही. मिरजमध्ये शिवसेनेचे उमेदवार तानाजी सातपुते हे महाविकासा आघाडीचे उमेदवार असतील. त्यामुळे काँग्रेस पक्ष त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करेल असा शब्द त्यांनी आम्हाला दिला आहे. असे स्पष्टीकरण शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले आहे.
हे ही वाचा