(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आंबेडकरी नेते एकत्र येत असतील तर प्रकाश आंबेडकरांकडे नेतृत्व देण्यास तयार : रामदास आठवले
रिपब्लिक पक्ष एकत्रित येत असतील तर माझी मंत्रिपद सोडण्याचीही तयारी असल्याचंही रामदास आठवले यांनी म्हटलं.
मुंबई : गटगटात विभागले गेले आंबडकरी नेते आणि त्यांचे पक्ष नेहमीच चर्चेचा विषय असतात. मोठे पक्ष आंबेडकरी जनतेची मतं मिळवण्यासाठी नेहमीच या नेत्यांचा वापर करुने घेतात, हे सर्वश्रुत आहे. मात्र भविष्यात रिपब्लिकन पक्षाचे विविध गट एकत्र येत असतील तर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्व देण्याची तयारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दर्शवली आहे.
वेगवेगळे राहून राजकीय फायदा होत नाही, एकत्र येणे हीच काळाची गरज आहे. रिपब्लिक पक्ष एकत्रित येत असतील तर माझी मंत्रिपद सोडण्याचीही तयारी असल्याचंही रामदास आठवले यांनी म्हटलं.
आंबेडकरी समाजाला एकत्र यावे असं वाटत असेल तर समाजाने नेत्यांवर दबाव आणावा. वंचित आघाडीला एकही जागा मिळणार नाही, माझा 1996 चा तिसऱ्या आघाडीचा अनुभव आहे. प्रकाश आंबेडकर यांनी हातमिळवणी केली तर पुढल्या पाच वर्षातील राजकीय भुमिका ठरवू अशी ऑफरही आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिली.
VIDEO | आंबेडकरी नेते एकवटल्यास प्रकाश आंबेडकरांना नेतृत्व देऊ : रामदास आठवले | मुंबई | एबीपी माझाअनुसूचित जाती-जमातीच्या हितासाठी ज्यांच्याकडून राजकीय लाभ मिळेल त्यांच्यासोबत मी आणि प्रकाश आंबेडकर जाऊ अशी माझी भूमिका आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांनी आधी एकत्र यावे. निर्णय घेताना बहुमताने, एकमताने निर्णय घेऊ. दलित समाजातील विचारवंतांनी यासाठी प्रयत्न आणि मार्गदर्शन करावे, असं आवाहनही रामदास आठवले यांनी केलं.