Rajya Sabha Election 2022 : बोलताना काळजी घ्या, फोन टॅप होण्याची शक्यता, भाजप आमदारांना सूचना
Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जूनला निवडणूक पार पडणार आहे. यासाठी सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झालेली आहे.
Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जूनला निवडणूक पार पडणार आहे. यासाठी सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झालेली आहे. कुठल्याही प्रकारची मतं फुटू नये यासाठी प्रत्येक पक्ष तयारी करताना पाहायला मिळत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधक भाजपने आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे. बुधवारी सत्ताधारी आणि विरोधकांची बैठक पार पडली. यामध्ये निवडणूकीची रणनिती ठरवण्यात आली.
भाजप आमदारांच्या बैठकीत नेमकं काय झालं?
सुत्रांच्या माहीतीनुसार, आज झालेल्या भाजपच्या बैठकीत आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये फोनवर बोलताना काळजी घ्या. फोन ट्रॅक होत असल्याचा शंका उपस्थित करण्यात आली आहे. तसेच भाजपाची ठरलेली रणनिती बाहेर न जाण्यासाठी खबरदारी घ्या असाही सल्ला देण्यात आलाय. दरम्यान, मुंबई बाहेर न पडण्याचे आमदारांना आदेश देण्यात आलाय. भाजप आमदारांना अद्याप व्हीप बजावला नाही. उद्या व्हीप बजावला जाऊ शकतो.
महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल 18 वर्षानंतर राज्य सभेची निवडणूक होत आहे. निवडणूक टाळण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न करण्यात आले. पण त्यांना अपयश आले. आता निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झालेय. या निवडणूकीत कोणताही दगा फटका होऊ नये, त्यामुळे महाविकास आघाडीने आणि भाजपनेही सर्व आमदारांना एकत्र हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रशिक्षण दिलं जाणार-
राज्यसभा निवडणुकीसाठी कसं मतदान करायचं यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रवादीचे अनुभवी काही नेते असणार तर काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी पोलिंग ऑफिसर म्हणून राष्ट्रवादीकडून खासदार सुनील तटकरे असणार आहेत. मतदानाच्या वेळी काही दगाफटका होऊ नये यासाठी अनुभवी म्हणून सुनिल तटकरे यांची निवड करण्यात आली आहे.
देशमुख आणि मलिकांना मतदानाची परवानगी मिळणार का?
शुक्रवारी राज्यसभेकरता मतदानाला हजेरी लावण्याची परवानगी मागत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी कोर्टात अर्ज केलाय. दोघांच्या अर्जाला ईडीचा जोरदार विरोध. कैद्यांना मतदानाचा अधिकारच नाही, असा दावा ईडीनं कोर्टात केलाय. काल दिवसभराच्या युक्तिवादानंतर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला होता. न्यायाधीश राहुल रोकडे गुरूवारी पहिल्या सत्रात निकाल जाहीर करणार आहेत.