एक्स्प्लोर
सरकारचा खोटारडेपणा उघड, 'मी लाभार्थी' जाहिरातीतील 'मॉडेल' राज ठाकरेंच्या मंचावर
सोलापुरच्या सभेत राज ठाकरेंनी त्या जाहिरातीत काम केलेल्या हरिसाल गावच्या तरुणालाच मंचावर बोलावले आणि सरकारचा खोटारडेपणा उघड केला.
सोलापूर : राज्य सरकारच्या 'मी लाभार्थी' जाहिरातीतील डिजीटल व्हिलेजची राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पोलखोल केली आहे. सोलापुरच्या सभेत राज ठाकरेंनी त्या जाहिरातीत काम केलेल्या हरिसाल गावच्या तरुणालाच मंचावर बोलावले आणि सरकारचा खोटारडेपणा उघड केला.
अमरावती जिल्ह्यातील हरिसाल हे 'डिजीटल व्हिलेज' असल्याची जाहीरात सरकारकडून करण्यात आली होती. राज ठाकरेंनी मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेत या जाहिराती बद्दलचा एक व्हिडीओ समोर आणला होता. सरकारकडून या गावाबद्दल जाहिरातीत करण्यात आलेले दावे खोटे असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज ठाकरेंचा दावा खोटा असल्याचं सांगितलं होतं. आज राज ठाकरेंनी त्या जाहिरातीत काम केलेल्या हरिसाल गावच्या मनोहर खडके या तरुणालाच मंचावर बोलावले आणि खरी सरकारचा खोटारडेपणा उघड केला.
सरकारने त्या तरुणाचा जाहिरातीसाठी वापर करुन घेतल्याचा आरोप राज यांनी केला. सरकारच्या 'त्या' जाहिरातीतं शुटिंग सुद्धा हरिसाल येथे झालं नसून मुंबईच्या आसपास झाल्याचं राज यांनी सांगितलं. सध्या मनोहर गावाकडचं त्याचं दुकान बंद करुन पुणे-मुंबई कडे रोजगारासाठी फिरतो असल्याचंही सांगितलं. तसेच भाजपचे कार्यकर्ते सध्या त्याला शोधत असून त्याला फोन करुन झालं गेलं विसरुन जा, अशी विनवणी करत असल्याचंही राज यांनी भाषणात सांगितलं.
भाजपने पैसे वाटले तर घ्या, मात्र त्यांच्याकडे परत ढुंकूनही पाहू नका : राज ठाकरे
स्टँड अप इंडिया, मेक इन इंडिया, स्मार्ट सिटीचं काय झालं? राज ठाकरेंचा भाजपला सवाल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
राजकारण
बीड
ठाणे
Advertisement