Raigad Nagarpanchayat Election : रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व
Raigad : रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीत झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपले वर्चस्व निर्माण केले असून पाली येथील नगरपंचायतीवर शेकाप - राष्ट्रवादी युतीने विजय मिळविला आहे.

रायगड : रायगड जिल्ह्यातील (Raigad Nagarpanchayat Election) खालापूर, माणगाव, तिला, माणगाव, पोलादपूर आणि म्हसळा नगरपंचायतीची मतमोजणी बुधवारी पार पडली आहे. यावेळी, दोन टप्य्यात झालेल्या या निवडणुकीमध्ये पाली नगरपंचायतीची यंदाची पहिली निवडणूक पार पडली असून यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु होती. तर, पाली येथील नगरपंचायतीवर सत्ता स्थापण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांनी युती करीत शिवसेना आणि भाजप विरोधात उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे, खासदार सुनील तटकरे आणि शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. त्यातच , विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पोलादपूर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये विशेष लक्ष केंद्रित करीत सत्तापलट करण्याचा प्रयत्न केला होता.
तर जिल्ह्यातील माणगाव , खालापूर, येथील निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असताना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आणि अॅडव्होकेट राजीव साबळे यांनी माणगाव नगरपंचायतीवर आपले वर्चस्व निर्माण करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ, शिवसेना सात आणि इतर दोन उमेदवार विजयी झाले आहे. यावेळी, शिवसैनिकांनी निकालानंतर जल्लोष साजरा करत विजयाचा आनंद साजरा केला. तर, माणगाव येथील एक मताच्या फरकाने राष्ट्र्वादाची काँग्रेसचा पराभव केला आहे.
त्यातच, खालापूर येथील नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना -राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीच्या उमेदवारांनी शिवसेना - आठ आणि राष्ट्रवादी - दोन अशा दहा जागांवर विजय मिळवीत शेकापचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर मात केली आहे. यावेळी, सेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीमध्ये बसून भंडारा उडवीत विजय साजरा केला. तर, आजच्या या विजयामुळे आमदार महेंद्र थोरवे यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे.
दरम्यान, आजच्या या निवडणूक निकालामध्ये शिवसेनेची सत्ता असलेल्या तळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने दहा जागांवर विजय मिळविला आहे. तर , भाजपला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्याचबरोबर, म्हसळा येथील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 13 उमेदवारांच्या विजयाने आपली सत्ता कायम ठेवली आहे. तर, यावेळेस पोलादपूर येथील निवडणूक ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील तिरंगी लढतीमुळे लक्षवेधी बनली होती. यामध्ये, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी विशेष लक्ष देत विरोधी पक्षांना आवाहन देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पोलादपूर येथील रहिवाशांनी शिवसेनेला मताधिक्य देत दहा उमेदवार निवडून दिले आहेत. यामुळे , स्थानिक आमदार भरत गोगावले यांचा बालेकिल्ला असलेल्या नगरपंचायतीवर पुन्हा एकदा शिवसेनेला आपले वर्चस्व ठेवण्यात यश आले आहे .
रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीचा अंतिम निकाल
तळा
- राष्ट्रवादी काँग्रेस - 10
- शिवसेना -04
- भाजप -03
खालापूर
- शिवसेना -08
- शेकाप -03
- राष्ट्रवादी काँग्रेस - 02
पोलादपूर
- शिवसेना - 10
- राष्ट्रवादी काँग्रेस - 06
- भाजप - 01
म्हसळा
- राष्ट्रवादी काँग्रेस - 13
- शिवसेना - 02
- काँग्रेस - 02
माणगाव
- राष्ट्रवादी काँग्रेस - 08
- शिवसेना - 07
- इतर - 02
पाली
- राष्ट्रवादी काँग्रेस - 06
- शिवसेना - 04
- शेकाप - 04
- भाजप -02
- अपक्ष - 01
हे देखील वाचा-
- Sindhudurg Nagarpanchayat Election : कुडाळमध्ये नारायण राणेंना तर देवगडमध्ये नितेश राणेंना मोठा धक्का
- Karjat Nagarpanchayat Election : विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जिंकली; आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया
- पोलीसमामा, आमच्या शाळा तुम्ही तरी सुरु करा, कच्च्या बच्च्यांचं थेट पोलिसांना आवाहन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
