एक्स्प्लोर
Advertisement
Satara Loksabha Bypoll Election : साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची चर्चा
उदयनराजे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. उदयनराजे यांच्या राजीनाम्यामुळे साताऱ्याची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे उदयनराजेंविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने कंबर कसली आहे.
सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणूक आगामी विधानसभा निवडणुकांसोबतच घेतली जाणार आहे. पोटनिवडणूक जाहीर होताच साताऱ्यातून उदयनराजेंच्या विरोधात निवडणुकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत आलं आहे. तसेच सिक्किमचे माजी राज्यपाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीनिवास पाटील यांचंही नाव चर्चेत आलं आहे. त्यामुळे उदयनराजेंविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने कंबर कसली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांना तातडीने दिल्लीत सोनिया गांधींकडून बोलावणं आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच, याबाबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात पुन्हा चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं या दोघांपैकी एक जण उदयनराजेंच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे.
Udayaranraje Bhosale | शरद पवारांच्या आठवणींनी उदयनराजे गहिवरले | सातारा | ABP Majha
उदयनराजे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. उदयनराजे यांच्या राजीनाम्यामुळे साताऱ्याची जागा रिक्त झाली होती. विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होईल, याच अटीवर उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं बोललं जात होतं.
दरम्यान विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार या मिलियन डॉलर प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. दिवाळीपूर्वीच राज्यात निवडणूक पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक 2019 ची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणात 21 ऑक्टोबरला मतदान होईल. तर निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिल्लीत याबाबत घोषणा केली. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होणार आहे. तर हरियाणाच्या 90 जागांसाठी मतदान होईल. दोन्ही राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
Udayanraje Bhosale | महाराष्ट्राच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे उदयनराजेकंडून | सातारा | ABP Majha
संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
Advertisement