Pratibha Pawar : 'मी चोरी करायला आलीये का?' बारामती टेक्सटाईल पार्कच्या गेटवर अडवल्यावर प्रतिभा पवारांचा संताप
Pratibha Pawar : बारामती टेस्कटाईल पार्कच्या गेटवर रोखण्यात आल्यानंतर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार चांगल्याच संतापलेल्या पाहायला मिळाल्या.
Pratibha Pawar, Baramati : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती टेस्कटाईल पार्कच्या गेटवर रोखण्यात आलं आहे. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबण्यात आलं होतं. अर्धा तासानंतर त्यांना आतमध्ये सोडण्यात आलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या ऑफिसकडून ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, गेटवर अडवल्यानंतर प्रतिभा पवार चांगल्याच संतापलेल्या पाहायला मिळत आहेत.
प्रतिभा पवार गेटवर अडवल्यानंतर सुरक्षा रक्षकांना काय म्हणाल्या?
प्रतिभा पवार म्हणाल्या, तुम्ही गेट का बंद केलं? आम्हाला पाहून गेट बंद केलं का? तुम्हाला कुठून फोन आला? कोणाचा फोन आला? आतमध्ये सगळं सुरु आहे की बंद आहे? आतमध्ये सगळं सुरु आहे तर मग अडवत का आहात? आम्ही चोरी करायला थोडीच आलो आहोत. आम्हाला इथे खरेदी करायची आहे. ज्यांनी बंद करायला सांगितले आहे, त्यांना सांगा आम्हाला खरेदी करायची आहे.
आईला अडवल्यानंतर सुप्रिया सुळेही संतापल्या
सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी आई प्रतिभा पवार माझी मुलगी रेवती सुळे... या दोघी बारामतीतल्या टेक्सटाइल पार्कमध्ये गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांना अर्धा तास थांबून ठेवण्यात आल्याची मला माहिती कळाली आहे. ज्या शरद पवारांनी बारामतीत हे पार्क उभा केलं त्या शरद पवारांच्या पत्नीला अर्धा तास त्या ठिकाणी थांबवलं जातं... आता सत्ता आहे म्हणून हे ठीक आहे, ते लोकांना कसेही वागवू शकतात....
दरम्यान, अर्धा तास वाट पाहिल्यानंतर प्रतिभा पवार यांना बारामती टेस्कटाईल पार्कच्या गेटमधून आत सोडण्यात आले आहे. सीएओंचा फोन आल्याने मी गेट बंद केलं, असल्याचे स्पष्टीकरण सुरक्षारक्षकाने यावेळी बोलताना दिलं आहे.
आमचं सरकार आल्यावर सर्वच गुन्हे आम्ही तात्काळ मागे घेणार
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महिला अत्याचारावर शेतकरी प्रश्नावर आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकांनी काम केलं त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. आमचं सरकार आल्यावर सर्वच गुन्हे आम्ही तात्काळ मागे घेणार आहोत. अजित पवार यांच्या बद्दल बोलणं सुप्रिया सुळे यांनी टाळलं.. राम कृष्ण हरी म्हणत हात जोडले.
Pratibha Pawar Baramati : प्रतिभा पवारांना बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
इतर महत्त्वाच्या बातम्या