AAP : कैलाश गेहलोत यांचा आपला धक्का, केजरीवालांचीही मोठी खेळी, BJP चे माजी आमदार अनिल झा आपमध्ये दाखल
Delhi Politics : नवी दिल्लीत आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. भाजप आणि आपमध्ये दोन्ही पक्षातील नेत्यांचं पक्षांतर सुरु आहे.
Delhi News नवी दिल्ली : नवी दिल्लीत आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. भाजप आणि आम आदमी पक्षातील नेत्यांकडून पक्षांतर सुरु झालं आहे. दिल्लीतील भाजपचे माजी आमदार अनिल झा यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. तर, आपच्या कैलाश गहलोत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेऊ शकतात, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
दिल्लीतील भाजपचे माजी आमदार अनिल झा यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी त्यांना पक्षाचं सदस्यत्व दिलं. आपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनिल झा यांनी आपच्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील मॉडेलचं कौतुक केलं. अनिल झा हे किराडीमधून भाजपचे दोन वेळा आमदार होते.
अरविंद केजरीवाल यांनी सन्मान दिल्याचं अनिल झा म्हणाले. अनिल झा भाजपचे पूर्वांचलमधील महत्त्वाचे नेते असून भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. आपचे नेते आणि मंत्री कैलास गहलोत यांनी राजीनामा दिल्यानंतर अनिल झा यांनी पक्षप्रवेशाचं टायमिंग साधलं आहे.
अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत दोन सरकार असल्याचं म्हटलं, एक सरकार दिल्लीचं आणि दुसरं केंद्राचं सरकार असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारकडे खूप पैसे आहेत. पूर्वांचलमधील लोक त्यांना एकही मत का देत नाहीत, असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला.
कैलाश गहलोत यांचा राजीनामा, आपला धक्का
दिल्लीतील परिवहन, माहिती व तंत्रज्ञान, महिला व बालविकास मंत्री कैलाश गहलोत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दिल्ली सरकार आणि आम आदमी पार्टीनं केंद्रासोबत वाद घालण्यात वेळ घालवला. केंद्रावर आरोप प्रत्यारोप करण्यात आप नेते व्यस्त राहिले. याचा परिणाम विकासकामांवर होतो, असं कैलाश गहलोत म्हणाले. जनतेला जी आश्वासनं केली होती ती आश्वासनं पूर्ण करु शकलो नाही, असंही गहलोत म्हणाले.
कैलाश गहलोत भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरु असताना आपचे खासदार संजय सिंह यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपनं कैलाश गहलोत यांच्यावर 112 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, त्यांच्यावर दबाव निर्माण केला,यामुळं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं संजय सिंह म्हणाले. कैलाश गहलोत यांना भाजपकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता, असंही संजय सिंह म्हणाले पाच वर्ष ते आपच्या सरकारचे सदस्य होते, असंही संजय सिंह म्हणाले.
इतर बातम्या :