Goregaon Vidhan Sabha constituency: गोरेगाव विधानसभा मतदारसंघात विद्या ठाकूर आणि समीर देसाईंमध्ये काँटे की टक्कर, कोण बाजी मारणार?
Goregaon Vidhan Sabha constituency: गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील लढतीचे अपडेटस् आणि निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Goregaon Vidhan Sabha constituency: एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असणारा आणि अलीकडच्या काळात भाजपचे वर्चस्व असलेल्या गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यंदा चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. भाजपच्या विद्या ठाकूर (Vidya Thakur) या गोरेगाव विधानसभेच्या (Goregaon Vidhan Sabha) विद्यमान आमदार आहेत. 1990 पासून गोरेगाव विधानसभा हा शिवसेनेचा अभेद्य गड होता. या मतदारसंघातून ठाकरे गटाचे सुभाष देसाई तीनवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. मात्र, 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या विद्या ठाकूर यांनी सुभाष देसाई यांना पराभवाचा धक्का देत त्यांचे संस्थान खालसा केले. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही विद्या ठाकूर यांनी गोरेगावमधील आपले वर्चस्व अबाधित राखले होते.
मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आणि दहा वर्षांच्या अँटी-इन्कबन्सीमुळे विद्या ठाकूर यांना यंदाची लढाई अवघड जाऊ शकते. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाने ज्येष्ठ नेते समीर देसाई आणि मनसेचे वीरेंद्र जाधव हे रिंगणात आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर गोरेगावमधील अनेक पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांना गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून 23 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे गोरेगाव विधानसभेची यंदाची लढाई भाजपच्या विद्या ठाकूर यांच्यासाठी अवघड ठरेल, अशी दाट शक्यता आहे. आता या लढतीत कोणाचा विजय होणार, याचा निकाल 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.