एक्स्प्लोर

Baramati : जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांगभलं होतंय... बारामतीच्या शेवटच्या सभेत प्रतिभा पवारांनी झळकावला बॅनर

Pratibha Pawar Banner : बारामतीमध्ये काका-पुतण्याच्या संघर्षाचा दुसरा अंक सुरू झाला असून त्यामध्ये शरद पवारांच्या प्रतिष्ठेची तर अजित पवारांच्या अस्तिवाची लढाई सुरू असल्याचं दिसून येतंय. 

बारामती : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभेच्या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागल्याचं दिसतंय. शरद पवारांची आणि अजित पवारांची शेवटची सभा ही बारातमीमध्येच होत असून त्या निमित्ताने राजकारण चांगलंच तापल्याचं दिसलंय. शरद पवार हे युगेंद्र पवारांसाठी शेवटची सभा घेत असून त्या सभेत एका गोष्टीने मात्र महाराष्ट्राचं लक्ष वेधलं. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या त्या सभेला प्रेक्षकांच्या गर्दीत बसल्या होत्या आणि त्यांनी एक बॅनरही झळकावला. 'जिकडं म्हातारं फिरतंय तिकडे चांगभलं होतंय' अशा आशयाचं बॅनर प्रतिभा पवारांनी झळकावलं आणि कार्यकर्त्यानी एकच जल्लोष केल्याचं दिसून आलं. 

प्रतिभा पवारांच्या हातात बॅनर झळकला

बारामतीच्या निवडणुकीत कधी नव्हे ते शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार चर्चेत आल्या आहेत. आधी अजितदादांनी त्यांची जाहीर तक्रार केली. प्रतिभाकाकी या आधी कधी कुणाच्या प्रचारात आल्या नाहीत. आता नातवाचा इतका पुळका का आलाय असा प्रश्न मी त्यांना विचारणार असल्याचं अजित पवार म्हणाले. तर बारामती टेक्स्टाईल पार्कच्या गेटवर प्रतिभा पवारांना अडवण्यात आल्याची घटनाही घडली. त्यानंतर आता प्रतिभा पवार यांनी शरद पवारांच्या बारामतीच्या शेवटच्या सभेत हजेरी लावली. नुसताच त्या ठिकाणी हजेरी लावली नाही तर त्यांनी युगेंद्र परवा यांना आशीर्वाद दिला.

यावेळी प्रतिभा पवार यांच्या हातामध्ये एक बॅनर असल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. 'जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांगभलं होतंय...' असं त्या बॅनरवर लिहिल्याचं दिसून आलं. शरद पवारांनी शेवटच्या टप्प्यात सभांचा जो काही धडाका लावलाय त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची उर्जा निर्माण झाल्याचं दिसून येतंय. 

पवार कुटुंबातील संघर्षाचा दुसरा अंक सुरू

बारामतीमध्ये यंदा काका-पुतण्यामध्ये काट्याची टक्कर होणार असल्याचं दिसून येतंय. शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा लागली आहे. बारामतीमधील ही लढाई ही आता राजकीय उरली नसून ती कुटुंबात पडलेली फूट असल्याचं उघड दिसतंय. याची सुरवात लोकसभेला झाली. अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली. मतदानापर्यंत धाकधूक लागून असलेल्या लढाईल मतदारांनी त्यांच्या मताचं दान मात्र शरद पवारांनाच दिलं आणि सुप्रिया सुळे निवडून आल्या. खुद्द बारामती विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना 47 हजाराहून अधिक मताधिक्य मिळालं. 

पवारांच्या कुटुंबातील लढाईचा आता दुसरा अंक सुरू झाला असून विधानसभेच्या निमित्ताने अजित पवारांना त्यांच्या पुतण्याने, युगेंद्र पवारांनी आव्हान दिलंय. मी लोकसभेला चूक केली होती, सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला उमेदवारी दिली अशी कबुली अजित पवारांनी दिली. त्याचवेळी आता ही चूक तुम्ही करू नका असं आवाहन अजित पवारांनी शरद पवारांना केलं होतं. पण शरद पवारांनी त्यांच्या नातवालाच, युगेंद्र पवारांनाच अजित पवारांच्या विरोधात उभं केलं. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Shelke on NCP Merger: 'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
Mumbai Mayor : बोललो होतो..मुंबईचा महापौर..हिंदू होणार..मराठी होणार...महायुतीचाच होणार! नितेश राणेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत
बोललो होतो..मुंबईचा महापौर..हिंदू होणार..मराठी होणार...महायुतीचाच होणार! नितेश राणेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत
Ritu Tawde Mumbai BMC Mayor: BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
Trump Tarrif on India: रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Shelke on NCP Merger: 'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
Mumbai Mayor : बोललो होतो..मुंबईचा महापौर..हिंदू होणार..मराठी होणार...महायुतीचाच होणार! नितेश राणेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत
बोललो होतो..मुंबईचा महापौर..हिंदू होणार..मराठी होणार...महायुतीचाच होणार! नितेश राणेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत
Ritu Tawde Mumbai BMC Mayor: BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
Trump Tarrif on India: रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
Malegaon Mayor Election 2026: काळ्या बुरख्यावर हिरवे फेटे, मालेगावात इस्लाम पार्टीच्या नगरसेवकांची स्वॅगमध्ये एन्ट्री
काळ्या बुरख्यावर हिरवे फेटे, मालेगावात इस्लाम पार्टीच्या नगरसेवकांची स्वॅगमध्ये एन्ट्री
Ritu Tawade: रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा
मोठी बातमी : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा
मोदींविरोधात विरोधी पक्ष आंदोलन करताना हत्येचा कटाचा संशय येतो, पण अजितदादांच्या संशयास्पद मृत्यूवर आम्ही बोलायचं नाही ही मुस्कटदाबी आहे का? तुम्ही अस्वस्थ का होताय? संजय राऊतांचा हल्लाबोल
मोदींविरोधात विरोधी पक्ष आंदोलन करताना हत्येचा कटाचा संशय येतो, पण अजितदादांच्या संशयास्पद मृत्यूवर आम्ही बोलायचं नाही ही मुस्कटदाबी आहे का? तुम्ही अस्वस्थ का होताय? संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Shiv Sena: शिवसेनेतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, एकनाथ शिंदेंचा शिलेदार महानगरप्रमुख, नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले...
शिवसेनेतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, एकनाथ शिंदेंचा शिलेदार महानगरप्रमुख, नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले...
Embed widget