एक्स्प्लोर
Advertisement
निवडणुकीच्या वर्षात मोदींना पसंती, 'एबीपी'चा सर्व्हे, एअर स्ट्राईकनंतर लोकप्रियतेत वाढ
भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअरस्ट्राईकनंतर नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढल्याचं सर्वेक्षणात दिसत आहे. मोदींना 55 टक्के जनतेने पसंती दिली असून राहुल गांधींची लोकप्रियता केवळ 19 टक्क्यांवर आली आहे.
नवी दिल्ली : यंदाचं वर्ष लोकसभा निवडणुकांचं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. निवडणुकीच्या वर्षात पंतप्रधानांची लोकप्रियता वाढली असून राहुल गांधींच्या लोकप्रियतेत मात्र घट झाल्याचं 'एबीपी न्यूज' आणि 'सी-व्होटर'च्या सर्व्हेमधून समोर आलं आहे.
विशेष म्हणजे भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअरस्ट्राईकनंतर नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढल्याचं सर्वेक्षणात दिसत आहे. मोदींना 55 टक्के जनतेने पसंती दिली असून राहुल गांधींची लोकप्रियता केवळ 19 टक्क्यांवर आली आहे.
एअर स्ट्राईक आणि नरेंद्र मोदींची लोकप्रियता
13 फेब्रुवारी (पुलवामा हल्ल्यापूर्वी) - 50%
26 फेब्रुवारी (एअर स्ट्राईक) - 55 %
7 मार्च - 62 %
निवडणुकीच्या वर्षात नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत वाढ
1 जानेवरी - 47%
1 फेब्रुवारी (बजेट) - 49 %
13 फेब्रुवारी (पुलवामा हल्ल्यापूर्वी) - 50%
26 फेब्रुवारी (एअर स्ट्राईक) - 55 %
1 मार्च (अभिनंदन परतले) - 58%
7 मार्च - 62%
पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदींची लोकप्रियता
2015 - 60 %
2016 - 62 %
2017 - 66 %
गेल्या वर्षातील नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख
जानेवरी 2018 - 63 %
ऑक्टोबर 2018 - 54 %
डिसेंबर 2018 - 58 %
एअर स्ट्राईकनंतर राहुल गांधी यांची लोकप्रियता
14 फेब्रुवरी (पुलवामा हल्ला) - 23%
26 फेब्रुवारी (एअर स्ट्राईक) - 19 %
7 मार्च - 16 %
निवडणुकीच्या वर्षात राहुल गांधींच्या लोकप्रियतेत घट
1 जानेवरी - 26%
1 फेब्रुवारी (बजेट) - 22 %
14 फेब्रुवरी (पुलवामा हल्ला) - 23%
26 फेब्रुवारी (एअर स्ट्राईक) - 19%
1 मार्च (अभिनंदन परतले) -18%
7 मार्च - 16%
मोदी पंतप्रधान झाल्यानंतर राहुल गांधींच्या लोकप्रियतेला उतरती कळा
2015 - 13 %
2016 - 12 %
2017 - 10 %
गेल्या वर्षातील राहुल गांधींच्या लोकप्रियतेचा आलेख
जानेवरी 2018 - 13 %
ऑक्टोबर 2018 - 23 %
डिसेंबर 2018 - 21 %
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement