एक्स्प्लोर

Kothrud constituency: कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांना पक्षातून आव्हान; बंड शमवण्यासाठी बावनकुळे मैदानात, इच्छुक उमेदवारांच्या घरी जाऊन घेतली भेट

Kothrud Assembly constituency: अमोल बालवडकर कोथरुडमधून बंडखोरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी बावनकुळे पोहोचले. बाणेरमध्ये त्यांनी अमोल बालवाडकरांची भेट घेतली आहे.

Kothrud Assembly constituency: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षातील नेत्यांमध्ये आता खडाजंगी दिसून येत आहे. पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये उमेदवारीसाठी खडाजंगी सुरु असल्याचं चित्र दिसून येत आहे. आज कोथरुडमधून इच्छुक उमेदवार अमोल बालवडकर यांच्या घरी जाऊन चंद्रशेखर बावनकुळेंनी भेट घेतली. अमोल बालवडकर कोथरुडमधून बंडखोरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी बावनकुळे पोहोचले. बाणेरमध्ये त्यांनी अमोल बालवाडकरांची भेट घेतली आहे.

विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना विरोधकांपेक्षा भाजपच्याच अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. बालवाडीचे नगरसेवक अमोल बालवाडकरांनी थेट चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले आहे. अमोल बालवडकर बंडखोरी करायच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी आता थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या पोहोचले आहेत आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. 

निवडणुकीत मतांचा फटका बसू नये यासाठी पक्षाला आणि पक्षश्रेष्ठींना बंडखोरी होऊ नये, यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. भाजपच्यावतीने कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांचं नाव चर्चेत आहे. अशातच माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी देखील भाजपकडून विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावरून भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरु झाल्याच्या चर्चा आहेत. याआधी बालवडकर यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केला होता.

पर्वती मतदासंघात माधुरी मिसाळांना पक्षातूनच आव्हान

कोथरूडप्रमाणेच पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपमध्येच उमेदवारीसाठी खडाजंगी सुरू असल्याचं दिसून येत आहे. भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची राज्य कंत्राटी कामगार सल्लागार म्हणून निवड करून भाजपने त्यांच्या उमेदवारीला ब्रेक लावला. मात्र, त्यानंतर त्यांनी आक्रमक प्रवित्रा घेत मला महामंडळ नको विधिमंडळ हवंय असं म्हणत थेट पर्वती विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे आता पक्षातील नेत्यांची आणि पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार आहे

मागील तीन टर्म या मतदार संघात भाजपच्या माधुरी मिसाळ या आमदार आहेत. मात्र, भाजपच्या श्रीनाथ भिमाले यांनीच माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांना भाजपच्याच गटबाजीला तोंड द्यावं लागणार आहे. 'मी महामंडळ मागितलं नाही, तर विधिमंडळ मागितलं असून मला माझ्या पक्षाकडून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळेल.' असा ठाम विश्वास श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion : गिरीश महाजन, नरहरी झिरवाळ, दादा भुसे...; उत्तर महाराष्ट्रातून कोण-कोण घेणार मंत्रि‍पदाची शपथ?
गिरीश महाजन, नरहरी झिरवाळ, दादा भुसे...; उत्तर महाराष्ट्रातून कोण-कोण घेणार मंत्रि‍पदाची शपथ?
मोठी बातमी! दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू, परभणीत अस्वस्थता
मोठी बातमी! दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू, परभणीत अस्वस्थता
Prakash Abitkar : एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला; प्रकाश आबिटकरांना प्रथमच मंत्रिपदांची संधी, राधानगरीला प्रथमच बहुमान! राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ
एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला; प्रकाश आबिटकरांना प्रथमच मंत्रिपदांची संधी, राधानगरीला प्रथमच बहुमान! राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ
Maharashtra Cabinet expansion: देवाभाऊच्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींना स्थान, तीन-तीन महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी
देवाभाऊच्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींना स्थान, तीन-तीन महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Cabinet Expansion : भाजपला 20, राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 12 मंत्रिपदं?Fadnavis Gadkari Banner Nagpur : गडकरी- फडणवीसांचं एकमेकांना अलिंगन; मोठं कटआऊट झळकलंWind Power : धाराशिवमधील मेसाई जळगावात पवन चक्की ठेकेदारांची दहशतDevendra Fadnavis Nagpur : मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस आज पहिल्यांदाच नागपुरात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Expansion : गिरीश महाजन, नरहरी झिरवाळ, दादा भुसे...; उत्तर महाराष्ट्रातून कोण-कोण घेणार मंत्रि‍पदाची शपथ?
गिरीश महाजन, नरहरी झिरवाळ, दादा भुसे...; उत्तर महाराष्ट्रातून कोण-कोण घेणार मंत्रि‍पदाची शपथ?
मोठी बातमी! दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू, परभणीत अस्वस्थता
मोठी बातमी! दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू, परभणीत अस्वस्थता
Prakash Abitkar : एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला; प्रकाश आबिटकरांना प्रथमच मंत्रिपदांची संधी, राधानगरीला प्रथमच बहुमान! राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ
एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला; प्रकाश आबिटकरांना प्रथमच मंत्रिपदांची संधी, राधानगरीला प्रथमच बहुमान! राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ
Maharashtra Cabinet expansion: देवाभाऊच्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींना स्थान, तीन-तीन महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी
देवाभाऊच्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींना स्थान, तीन-तीन महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी
Shivendraraje Bhonsle : शिवेंद्रराजे भोसलेंना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान, सातारा विधानसभा मतदारसंघाला 25 वर्षानंतर मंत्रिपदाचा मान
भाऊसाहेब महाराजांचा वारसा जपला, आता उदयनराजेंची भक्कम साथ, शिवेंद्रराजे भोसले यांची मंत्रिमंडळात वर्णी
संविधानावरून PM मोदींचा काँग्रेसवर हल्ला, आता संजय राऊतांकडून जोरदार प्रहार; म्हणाले, देशाचा आधार उद्ध्वस्त...
संविधानावरून PM मोदींचा काँग्रेसवर हल्ला, आता संजय राऊतांकडून जोरदार प्रहार; म्हणाले, देशाचा आधार उद्ध्वस्त...
लाडक्या बहिणींनी यंदा वाचवलं, मेहुण्यांनी दुसरी बटणं दाबली पण...; अजित पवारांनी सांगितली लोकसभेनंतरची परिस्थिती अन् लाडकी बहीण योजनेचं गणित
लाडक्या बहिणींनी यंदा वाचवलं, मेहुण्यांनी दुसरी बटणं दाबली पण...; अजित पवारांनी सांगितली लोकसभेनंतरची परिस्थिती अन् लाडकी बहीण योजनेचं गणित
Margashirsha Purnima 2024 : यंदाची मार्गशीर्ष पौर्णिमा 3 राशींसाठी ठरणार खास; 15 डिसेंबरपासून नशीब उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्सही वाढणार
मार्गशीर्ष पौर्णिमा 3 राशींसाठी ठरणार खास; 15 डिसेंबरपासून नशीब उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्सही वाढणार
Embed widget