Parli Vidhan Sabha Result 2024 : बीड जिल्ह्यात जरांगे फॅक्टर चालणार का, परळीत धनंजय मुंडेंचं काय होणार?
Parli Vidhan Sabha Result 2024, बीड : बीड जिल्ह्यात जरांगे फॅक्टर चालणार का, परळीत धनंजय मुंडेंचं काय होणार? परळीतील मतदार काय म्हणतात?
Parli Vidhan Sabha Result 2024, बीड : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. परळी विधानसभा मतदारसंघातील लढत ही राज्यातील हायव्होल्टेज लढतींपैकी एक आहे. काल मतदान पार पडल्यानंतर 'एबीपी माझा'ने या मतदारसंघातील मतदारांचा कल जाणून घेतला. यावेळी टॉवर परिसरातील मतदारांशी संवाद साधण्यात आला. यापैकी बहुतांश मतदारांनी बीड जिल्ह्यात महायुतीची सरशी होईल आणि परळीतही धनंजय मुंडे यांचा विजय होईल, अशी शक्यता वर्तविली.
बीड जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे सहाच्या सहा जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील. राज्यातही महायुतीची सत्ता येईल. लोकसभा निवडणुकीवेळी वेगळे वातावरण होते. पण गेल्या दोन महिन्यांत वातावरण महायुतीच्या बाजूने झुकले, असे मत बीड शहरातील मतदारांनी व्यक्त केले. महायुतीची लाडकी बहीण योजना आणि अन्य योजनांमुळे वातावरण बदलण्यास मदत झाली, असेही येथील मतदरांनी सांगितले. बीड शहरातील मतदारांच्या अंदाजानुसार, जिल्ह्यातील सर्व 6 जागा महायुतीला मिळतील. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आल्याने महायुतीला फायदा होईल. लोकसभेला विषय वेगळा होतो. पण आता विषय वेगळा आहे. आता महायुतीला वातावरण चांगलं आहे.
परळीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी
धनंजय मुंडे - अजित पवारांची राष्ट्रवादी
राजेसाहेब देशमुख - शरद पवारांची राष्ट्रवादी
मतदार काय काय म्हणाले?
40 टक्क्यांनी पुढे राहतील. 70 ते 75 हजारांनी निवडून येतील मुंडे.. पहिल्या पाच मंत्र्यांमध्ये राहणार आहेत..धनंजय मुंडे विक्रमी सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील. लोकसभेचा फॅक्टर चालणार नाही. 1 लाख प्लस मतांनी निवडून येणार आहेत, असं मत परळीतील मतदारांनी व्यक्त केलं आहे.
जिल्ह्यात कोणाते उमेदवार निवडून येतील?
महायुतीचे बीड जिल्ह्यात 6 उमेदवार निवडून येतील. भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने महायुतीची ताकद वाढली. शिवसेना इतकी प्रभावी नव्हती. अजितदादा राष्ट्रावादीचे आमदार होते. बीडमध्ये सहा जिल्ह्यात राज्यात महायुतीची सत्ता येईल, दोन महिन्यांत वातावरण बदललं आहे. महायुतीने लाडकी बहीण योजनेवर जोर दिला. परळीतून धनंजय मुंडे विक्रमी मतांनी निवडून येणार आहेत. त्या सत्तेत मनसे 100 टक्के असणार कोणाची सत्ता येऊ दे.. त्यांच्या 20 ते 25 जागा विजयी होतील, असं परळीतील मतदार म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या