Paranda Vidhansabha Election : मंत्री तानाजी सावंत यांच्यासमोर राहुल मोटे आणि रणजीत पाटलांचे आव्हान, कोण बाजी मारणार?
Paranda Vidhansabha Election : मंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात महाविकास आघडीकडून दोन उमेदवार मैदानात उतरवण्यात आले आहेत.
Paranda Vidhansabha Election : शिंदेंच्या शिवसेनेने विद्यमान आमदार आणि मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना पुन्हा एकदा परांडा विधानसभा मतदारसंघात मैदानात उतरले आहे. दरम्यान, तानाजी सावंत यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून दोन उमेदवार देण्यात आले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने परांड्यात राहुल मोटे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजीत पाटील यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांपैकी एकानेही माघार घेतली नाही, तर मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन झाल्यानंतर मतदारसंघात सहानुभूती ?
परांडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे काही आठवड्यांपूर्वी निधन झाले. ज्ञानेश्वर पाटील यांना मानणारा पंराड्यात मोठा वर्ग आहे. त्यामुळे रणजीत पाटील यांना परांड्यात सहानुभूती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, ज्ञानेश्वर पाटील यांची ताकद परांडा शहरात जास्त होती, असही बोलले जाते. त्यामुळे परांड्यात मानणारा वर्ग असला तरी भूम आणि वाशीमध्ये रणजीत पाटील यांना तुलनेने कमी सपोर्ट मिळू शकतो, असेही जाणकारांचे मत आहे. याशिवाय खासदार ओमराजे निंबाळकरही रणजीत पाटील यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी मतदारसंघात प्रचार सभा सुरु केल्या आहेत.
राहुल मोटे हे राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून राहुल मोटे यांनाही मैदानात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे परांड्यात राहुल मोटे यांचीही मोठी ताकद आहे. राहुल मोटे यापूर्वी तीन वेळेस परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. मात्र, महाविकास आघाडीत ही मैत्रीपूर्ण लढत होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे. गेल्या 20 वर्षातील जनसंपर्काचा राहुल मोटे यांना देखील फायदा होऊ शकतो.
तानाजी सावंत पुन्हा एकदा मैदानात
मंत्री तानाजी सावंत यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा परांडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. पहिल्यांदा निवडणूक लढवत असताना त्यांना ज्ञानेश्वर पाटलांचा सपोर्ट होता. मात्र, आता रणजीत पाटील त्यांच्या विरोधात असणार आहेत. गेल्या अडीच वर्षात मतदारसंघात वाढवलेला जनसंपर्क, विकास कामे ही तानाजी सावंत यांच्या जमेच्या बाजू आहेत. दरम्यान, असं असले तरी विरोधात असलेल्या दोन्ही उमेदवारांचा मतदारसंघात अनेक वर्षांचा जनसंपर्क आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांना देखील या निवडणुकीत मोठं आव्हान असणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्याकडून शपथपत्रात पाच अपत्यांचा उल्लेख