एक्स्प्लोर

Maharashtra Election 2024: मला सभा करायला लावताय, मग महामंडळ तरी द्या; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

Pankaja Munde Maharashtra Election 2024: पाथर्डी येथील महायुतीच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे बोलत होत्या. 

Pankaja Munde: शेवगाव पाथर्डीसाठी मुंडे साहेबांच्या काय भावना होत्या आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. ही माझ्या भगवान बाबांची भगवान गडाची भूमी आहे, या पाथर्डीचे मोठे भाग्य एका बाजूने वामन भाऊ तर एका बाजूने भगवान बाबा, तर एका बाजूने पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या आशीर्वाद देत आहे, असं भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या. पाथर्डी येथील महायुतीच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे बोलत होत्या. 

ज्यांचं कोणी वाली नाही त्यांच्यासाठी मुंडे साहेब राजकारणात आले. ज्यावेळी त्या अहिल्यानगरमध्ये आले त्यावेळी त्यांनी सांगितलं, मला गडावरून पंकजा दिसते. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता लोकांचं काम करायचं हे माझ्या वडिलांनी सांगितलं.  परळीपेक्षा पाथर्डीने माझा जास्त ऐकलं, माझ्या शब्दावर तुम्ही मोनिका राजळे यांना निवडून दिलं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मी सभांची यादी केली तेव्हा मोनिका राजळेंना म्हटलं. भाजप म्हटलं हेलिकॉप्टर नाही तेव्हा काय करावं... मी हे जे उडतंय (ड्रोनकडे पाहत ) अशा हेलिकॉप्टरमध्ये बसून आले, मी सिंगल इंजिनच्या हेलिकॉप्टरमध्ये जीव मुठीत धरून आले. आज एवढंसं हेलिकॉप्टर घेऊन मी आले...डबल इंजिनचे हेलिकॉप्टर राजनाथ सिंग यांच्या सभेला गेले म्हणाले.  मी म्हणाले स्कुटरला इंजिन बांधून द्या, पण मला सभेला जाऊद्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींची हॅट्रिक झाली मोनिकाताई यांची देखील करून टाका, असं आवाहन पंकजा मुंडेंनी यावेळी केलं. 

माझ्या हातात हे महामंडळ दिलं तर...; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

ऊसतोड कामगारांचे मुकादम आलेत का?, की गेले कर्नाटकाला, असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत विचारला. यावर काही मुकादम सभेला उपस्थित होते. यावेळी माझ्या हातात हे महामंडळ दिलं, तर तुम्हाला कुणाच्या पाया पडायची गरजचं लागणार नाही. पण तेच नाहीय ना...पण आता म्हणजे येवढं तर द्या...सभा तर करायला लावतात...महामंडळ तर द्या...पटकन दोन वर्षांत जिकडे-तिकडे करुन टाकते (सही)...असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडेंच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्याचप्रमाणे ऊसतोडीसाठी अजून उतरु नका...कारखाने अजून सुरु झालेले नाहीय...20 तारखेला मतदान करा आणि ऊस तोडायला जावा...असं पंकजा मुंडेंनी सांगितले. 

मुंडे साहेबांपेक्षा मी जास्त शेवगाव पाथर्डी मतदारसंघावर प्रेम केलं- पंकजा मुंडे

प्रत्येक निवडणुकीत एक अजेंडा असतो त्याचं रूप बदलून स्पिरीट तयार होतं. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीने काही दिलं नाही. मात्र आता स्पिरिट आहे. आता विजयाचे स्पिरिट घेऊन आपल्याला जायचं आहे. मुंडे साहेबांपेक्षा मी जास्त शेवगाव पाथर्डी मतदारसंघावर प्रेम केलं. मी मंत्री असताना एक रुपया देखील कमी दिला नाही. सख्खा भाऊ बहिणीला किती ओवाळणी देतो...पाचशे आणि हजार...मग मुख्यमंत्र्यांनी किती दिले पंधराशे रुपये दिले तिप्पट ओवाळणी दिली. तुमचे वीजबिल देखील माफ केले, तुमच्या वीजबिलवर भोपळा येतो तोच भोपळा विरोधकांना द्या..., असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

संबंधित बातमी:

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी भरसभेत केली अमित शाह यांची मिमिक्री; डोक्यावर तेल लावा म्हणजे..., Video

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMVA vs Mahayuti : प्रचाराच्या शेवटच्यादिवशी महायुती मविआत जाहिरात वॉरAjit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :18 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
Maharashtra Elections 2024 : ''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
Kannad Election 2024: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
Embed widget