एक्स्प्लोर

Palghar Vidhan Sabha : पालघर विधानसभेत शिंदे गटाची बाजी, राजेंद्र गावित यांच्याकडून ठाकरे गटाच्या जयेंद्र दुबळा यांचा पराभव

Palghar Assembly Constituency Election 2024 : पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे जयेंद्र दुबळा यांच्यात अटीतटीची लढाई झाली.

Palghar Vidhan Sabha Election 2024 : पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या राजेंद्र गावित यांनी विजय मिळवला. पालघर विधानसभेत यंदा शिवसेना शिंदे गट विरुद्द शिवसेना ठाकरे गट अशी रोमांचक लढत पाहायला मिळाली. पालघर विधानसभा मतदारसंघात महायुतीने शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी तिकीट दिलं होतं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जयेंद्र दुबळा यांना रिंगणात उतरवलं होतं. मात्र, शिवसेनेच्या राजेंद्र गावितांनी जयेंद्र दुबळा यांचा पराभव केला.

पालघरमध्ये भाजपचे जयेंद्र दुबळा विजयी

पालघर हा शिवसेनेचा गड मानला जातो. पालघर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित हे यांच्यात अटीतटीची लढाई झाली. गेल्या दोन टर्ममध्ये येथील मतदारांनी शिवसेनेला मत दिलं होतं आणि यंदाही जनतेनं धनुष्यबाणाचं बटण दाबलं आहे. पालघरमध्ये राजेंद्र गावित यांनी दोन वेळा खासदार म्हणून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे त्यांचा नागरिकांशी संवाद आहे. याचाच फायदा त्यांना या निवडणुकीत झाल्याचं दिसत आहे.

मतदारसंघातील समस्या

पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी वर्सोवा ते पालघर, पालघर ते विरार आणि पालघर ते डहाणू असा एक्स्प्रेस रस्ता अर्थात सिलिंक करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या सीलिंकमुळे नागरिकांचा प्रवास कमी वेळेत होईल. त्यासोबतच केंद्र सरकारने वाढवण बंदरासाठी 76 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. मच्छीमारांचा व्यवसाय देखील दुप्पट होईल. 12 लाख तरुणांना रोजगार देण्यात येईल. एमएमआरडीएचा विस्तार देखील पालघरपर्यंत होईल. पालघरला आपण नवीन एअरपोर्ट उभारत आहोत. यामुळे पालघर हा ग्रामीण विभाग न राहता भविष्यात हे देशाचे ग्रोथ इंजिन होईल, हे मुद्दे घेऊन महायुती प्रचारात उतरली आहे. त्यामुळे पालघरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांचे हात बळकट करावं, असं आवाहन महायुतीकडून करण्यात येत आहे.
 
पालघर विधानसभा निवडणूक क्षेत्र महाराष्ट्रातील 288 विधानसभा क्षेत्रांपैकी एक आहे. या मतदारसंघात पालघर आणि डहाणू तालुक्याच्या काही भाग येतो.  सौंदर्य आणि सांस्कृतिक विविधतेसाठी पालघर मतदारसंघ ओळखला जातो. पालघर विधानसभा शिवसेनेचा गड मानला जातो. त्यामुळे शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदाच्या निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

पालघरचा राजकीय इतिहास

पालघर क्षेत्राचा राजकीय इतिहास विविध पक्षांच्या प्रभावाखाली होता. 1962 मध्ये काँग्रेसचे श्रीधर पाटील विजयी झाले. त्यानंतर, 1967 मध्ये प्रजा समाजवादी पक्षाचे नवनीत्राई शाह यांनी झेंडा फडकवला. काँग्रेसने 1972 मध्ये विनायक पाटील विजयी झाले. 80 च्या दशकात काँग्रेसने आपली स्थिती पुनः मजबूत केली, पण 1990 नंतर इथे शिवसेनेचा दबदबा वाढू लागला. 1990 मध्ये अविनाश सुतार आणि 1995 मध्ये मनीषा निमकर यांनी शिवसेनेच्या तिकीटावर विजय मिळवला. मनीषा निमकर यांनी 1999 आणि 2004 मध्येही शिवसेनेची सीट जिंकून आणली. 2009 मध्ये काँग्रेसचे राजेंद्र गावित यांनी निवडणूक जिंकून काँग्रेसनं कमबॅक केलं. 2014 मध्ये शिवसेनेचे कृष्णा घोडा बाजी मारली. 2019 मध्ये शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांनी गड जिंकला.

पालघर विधानसभा मतदारसंघाचा 2024 चा निकाल

  • राजेंद्र गावित - शिवसेना (विजयी)
  • जयेंद्र दुबळा - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

पालघर विधानसभा निवडणूक 2019 चा निकाल

  • श्रीनिवास वनगा (शिवसेना) - 68,040 मते (विजयी)
  • योगेश नाम (काँग्रेस) - 27735 मते
  • उमेश गोवारी (मनसे) - 12819 मते

पालघर विधानसभा निवडणूक 2014 चा निकाल

  • कृष्णा घोडा (शिवसेना) - 46142 मते (विजयी)
  • राजेंद्र गावित (काँग्रेस) - 45627 मते
महत्वाच्या इतर बातम्या :
स्नेहल पावनाक
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding: लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृती मानधनाच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृतीच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding: लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृती मानधनाच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृतीच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
Embed widget