एक्स्प्लोर
निवडणूक प्रचारासाठी कार्यकर्ते मिळतील, उस्मानाबादेत मजूर सोसायट्यांची जाहिरात
लोकसभा निवडणुकीची सर्वत्र जोरदार तयारी सुरु असताना उस्मानाबादमधील दोन मजूर सोसायट्यांनी प्रचारासाठी तसेच सभांसाठी कार्यकर्ते पुरवण्याची भन्नाट आयडीया काढली आहे. फेसबुकवर देखील ही जाहिरात पोस्ट करण्यात आली आहे.

उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीची सर्वत्र जोरदार तयारी सुरु असताना उस्मानाबादमधील दोन मजूर सोसायट्यांनी प्रचारासाठी तसेच सभांसाठी कार्यकर्ते पुरवण्याची भन्नाट आयडीया काढली आहे. फेसबुकवर देखील ही जाहिरात पोस्ट करण्यात आली आहे. VIDEO | निवडणूक प्रचारासाठी भाड्याने कार्यकर्ते मिळतील | उस्मानाबाद | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा निवडणूक काळात राजकीय पक्षांना आपल्या उमेदवाराच्या प्रचाराला कार्यकर्ते कुठून आणणार असा अनेकदा प्रश्न पडतो. याच गोष्टीचा फायदा घेत उस्मानाबादच्या मजूर सोसायट्यांनी सभेला, प्रचाराला कार्यकर्ते मिळतील अशी जाहिरात दिली आहे. त्यासाठी या सोसायट्यांकडे नोंदणी करावी लागणार आहे. या सोसायट्यांद्वारे प्रत्येक राजकीय पक्षाला कमीत कमी 2 हजार आणि जास्तीत जास्त हवे तेवढे कार्यकर्ते पुरवले जाणार आहेत. यासाठी प्रत्येक मजुराला प्रतिदिवस 1 हजार रुपये मजुरी द्यावी लागणार आहे. व्हिडीओ : संबंधित बातम्या : मावळमध्ये नवखा उमेदवार आला तर त्याला सांभाळून घ्या, अजित पवारांचं भावनिक आवाहन भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये, शिवसेनेचा भाजपला सल्ला
आणखी वाचा




















