Omprakash Rajenimbalkar : कैलास पाटलांना देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिपदाची ऑफर दिली होती, ओमराजे निंबाळकरांचा गौप्यस्फोट
Omprakash Rajenimbalkar, धाराशिव : कैलास पाटील (Kailas Patil) यांनी फक्त पन्नास खोक्यांची नाही तर मंत्रिपदाची ऑफर आली होती, असा गौप्यस्फोट ओमराजे निंबाळकर यांनी केलाय.
Omprakash Rajenimbalkar, धाराशिव : कैलास पाटील (Kailas Patil) यांनी फक्त पन्नास खोक्यांना लाथ मारली नाही तर मंत्रीपदावर सुद्धा पाणी सोडलं. याचा मी स्वतः साक्षीदार असल्याचा गौप्यस्फोट खासदार ओमराजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांनी केला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच ही ऑफर माझ्याच फोनवरून केल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. ते धाराशिव येथील प्रचार सभेत बोलत होते.
माझ्याच फोनवर देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला
ओमराजे निंबाळकर म्हणाले, माझ्याच फोनवर देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. तेव्हा त्यांनी ओमराजे तुमची अडचण आहे, पण कैलास पाटील यांना काय अडचण आहे असा सवाल केला. तेव्हा मी म्हणलं ते माझ्याबरोबरच आहेत, त्यांना फोन देतो तुम्हीच बोला. फडणवीस यांनी कैलास पाटील यांना पहिल्यांदा राज्यमंत्री पद देतो म्हणाले. आमदार पाटील यांनी स्पष्ट शब्दात त्यास नकार दिला.
काही वेळानं पुन्हा फोन केला व फडणवीस यांनी मग कॅबेनेट मंत्री करतो म्हणाले. आमदार कैलास पाटील यांनी आपल्याला मुख्यमंत्री जरी केल तरी आपण तिकडे येणार नसल्याच ठामपणे सांगितलं. असा खुद्दार आमदार आपल्या मतदार संघाला मिळाला आहे. ज्यांनी स्वाभिमानी राहून आपल्या पक्षाशी इमान राखलं व जनतेनं टाकलेल्या मताशी ते प्रामाणिक राहिले. त्यामुळं मला अश्या आमदाराचा निश्चित अभिमान असल्याचं खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले. कैलास पाटील यांच्या प्रचारसभेत ओमराजे बोलत होते.
हिंदू, इस्लाम कोणीच धोक्यात नाही, यांची खुर्ची धोक्यात आहे
पुढे बोलताना ओमराजे म्हणाले, विरोधक उगाच भिती दाखवत आहेत, आम्ही बटेंगे भी नही और कटेंगे भी नही. तुम्ही जरा दम काढा. मोदी साहेब असताना देखील हिंदू धोक्यात कसा आहे? हिंदू, इस्लाम कोणीच धोक्यात नाही, यांची खुर्ची धोक्यात आहे. मी वाट पाहात होतो, देवाकडे मागणी होती. अशी संधी दे की मोदी विरोधात असताना जेवढ्या मतांनी गेल्यावेळी निवडून आलो. त्यापेक्षा 1 मत जास्त घेऊन निवडून येऊदे. ही संधी आली. लोकसभा निवडणुकीत सर्वजण विरोधात होते, तरीही मी निवडून आलो. सहा मधील पाच आमदार विरोधात होते, तरिही तुम्ही साथ दिली. मला 3 लाख 29 हजार मतांनी विजयी केलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या