मतांच्या खरेदीसाठी केवळ सत्ताधारी पक्षाच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी, मध्यमवर्गीय मराठी कंत्राटदारांचे थकित 80 हजार कोटी रुपये देण्यासाठी नाहीत, रोहित पवारांचा प्रहार
Rohit Pawar on Mahayuti Goverment: रोहित पवार यांनी सत्ताधारी आमदारांनाच निधी देण्यावरून महायुती सरकारवर सडकून टीका केली आहे.

Rohit Pawar on Mahayuti Goverment: महायुती सरकारमधील सत्ताधारी आमदारांनाच निधीच खिरापत सुरूच असल्याने विरोधकांकडून घणाघाती प्रहार सुरू आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar on Mahayuti Goverment) सुद्धा सत्ताधारी आमदारांनाच निधी देण्यावरून महायुती सरकारवर सडकून प्रहार केला आहे. अशा पद्धतीने पैसा देणं म्हणजे मतांची खरेदी खरेदी करण्यासाठी केलेला हा राजकीय जुगाड तर आहेच पण लोकशाहीची थट्टा असल्याचा प्रहार रोहित पवार यांनी केला आहे. खोक्यातून जन्म घेतलेल्या सरकारकडून समान न्यायाची अपेक्षा करणे म्हणजे गुंडांकडून सद्वर्तनाचं सप्रवचन ऐकण्यासारखं आहे, अशा शब्दात रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून सत्ताधारी आमदारांवर होत असलेल्या खिरापतीवर हल्लाबोल केला आहे.
मध्यमवर्गीय मराठी कंत्राटदारांचे थकित ८० हजार कोटी रुपये देण्यासाठी सरकारकडं पैसे नाहीत पण केवळ सत्ताधारी पक्षाच्या ५४ आमदारांना प्रत्येकी ५ कोटी ₹ द्यायला मात्र पैसे आहेत. विकासनिधीच्या नावाखाली सरकारी तिजोरीतील पैशातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतांची खरेदी…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 23, 2025
मराठी कंत्राटदारांचे थकित 80 हजार कोटी रुपये देण्यासाठी नाहीत
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मध्यमवर्गीय मराठी कंत्राटदारांचे थकित 80 हजार कोटी रुपये देण्यासाठी सरकारकडं पैसे नाहीत पण केवळ सत्ताधारी पक्षाच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी ₹ द्यायला मात्र पैसे आहेत. विकासनिधीच्या नावाखाली सरकारी तिजोरीतील पैशातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतांची खरेदी करण्यासाठी केलेला हा राजकीय जुगाड तर आहेच पण लोकशाहीची थट्टाही आहे. शेवटी जात, धर्म असा भेदभाव करून आणि खोक्यातून जन्म घेतलेल्यांकडून समान न्यायाची आणि लोकशाहीचा सन्मान करण्याची अपेक्षा करणं म्हणजे गुंडाकडून सद्वर्तनाचं प्रवचन ऐकण्यासारखं आहे.
पण निधी थांबवून शपथेलाच हरताळ फासला
दुसरीकडे, काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनीही हल्लाबोल केला होता. सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुजाभाव न करण्याची शपथ घेतात, मात्र आमदार नसलेल्या ठिकाणी निधी न देण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे त्या शपथेचा हरताळ फासण्याचा प्रकार आहे,” अशा शब्दात आमदार सतेज पाटील (Satej Patil on Mahayuti Government) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, त्यामुळे निधीच्या आमिषाने मतं मिळणार नाहीत, असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या

















