एक्स्प्लोर
Aditi Tatkare, Aniket Tatkare Interview : तटकरे कुटुंब दिवाळी कशी साजरी करतात?
एबीपी माझाच्या दिवाळी विशेष कार्यक्रमात मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि त्यांचे बंधू माजी आमदार अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांनी त्यांच्या कौटुंबिक दिवाळीच्या आठवणींना उजाळा दिला. 'पहिल्या दिवशी आजीकडून आंघोळ, दुसऱ्या दिवशी आईकडून आंघोळ आणि तिसऱ्या दिवशी मग पाडव्याला पत्नीकडून आंघोळ,' असं सांगत अनिकेत तटकरे यांनी तटकरे कुटुंबातील दिवाळीच्या पारंपरिक प्रथांची माहिती दिली. वडील खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यासह संपूर्ण कुटुंब सणांच्या निमित्ताने एकत्र येण्याचा प्रयत्न करतं. राजकारण आणि कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढून सर्वजण दिवाळीचे सर्व विधी, जसं की कंदील लावणे, पणत्या लावणे आणि एकत्र फराळ करणे, या गोष्टी आवर्जून जपतात. आम्ही सगळे मिळून बारीक-सारीक परंपरा एकत्रितपणे साजऱ्या करतो, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion















