एक्स्प्लोर

Ambadas Danve on Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात, धंगेकरांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा; जैन बोर्डिंग प्रकरणाच्या वादात अंबादास दानवेंची उडी

Ambadas Danve on Murlidhar Mohol: पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन घोटाळ्याच्या प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केलाय.

Ambadas Danve on Murlidhar Mohol: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) सातत्याने चर्चेत आहेत. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन घोटाळ्याच्या प्रकरणावरून त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर जमीन हडपल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीदेखील मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

Ambadas Danve on Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ सत्तेचा वापर करताय

अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत विचारले असता अंबादास दानवे म्हणाले की, धंगेकर जे बोलले त्याची चौकशी झाली पाहिजे, त्यांनी भाजपवर टीका केली होती. मुरलीधर मोहोळ हे केंद्र आणि राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात. जैन समाजाचा हॉस्टेल आहे. त्यात एक बिल्डर आणि त्यामागे मोहोळ असल्याचे समोर आले आहे. धंगेकर यांनी केलेल्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीय. 

Ambadas Danve on Delhi Taj Hotel Controversy: तर महाराष्ट्राच्या मुलींनीही कोल्हापूरी चप्पल घालून जायला पाहिजे

दिल्लीतील ताजमहाल हॉटेलमध्ये 'युअरस्टोरी'च्या संस्थापक आणि सीईओ श्रद्धा शर्मा यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मी कोल्हापुरी चप्पल घालते त्या मी माझ्या कष्टाच्या पैशांनी घेतलेल्या आहेत आणि इथे आले आहे, पण इथं स्टाफने मला पाय खाली ठेवून बसा, असं सांगितल्याचे म्हणत श्रद्धा शर्मा यांनी आपला संताप व्यक्त केला. याबाबत विचारले असता अंबादास दानवे म्हणाले की, हे चूक आहे, ती महाराष्ट्राची मुलगी आहे. ती कुठे बसली माहीत नाही, पण कोल्हापूर चप्पलची कॉपी एक कंपनीने केली होती, आपली एक मुलगी महाराष्ट्र संस्कृती दाखवत असेल आणि तिने असे केले असेल तर महाराष्ट्राच्या मुलींनी देखील अशा ठिकाणी कोल्हापूर चप्पल घालून जायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.  

Ambadas Danve on Mahesh Kothare: कोठारे चांगले कलाकार, पण...

महेश कोठारे यांनी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मागाठाणे परिसरात आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी केलेले एक वक्तव्य प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते. भाजप म्हणजे आपले घर आहे. मी स्वत: भाजपचा भक्त आहे. मी पंतप्रधान मोदींचाही भक्त आहे. आपल्याला इथून नगरसेवक निवडून आणायचा आहे. तसेच यावेळी महापौरही इथून निवडून गेलेला असेल. मुंबईत नक्कीच कमळ फुलेल, असे त्यांनी म्हटले होते. याबाबत विचारले असता अंबादास दानवे म्हणाले की, त्यांच्या स्टेजवर जाऊन लोणी लावून घेणं ही पद्धत आता झाली आहे. कोठारे हे चांगले कलाकार आहेत. पण, ते राजकीय पक्षाचे पाठबळ करत असतील तर लोक त्यांना तसेच पाहतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

आणखी वाचा 

Sanjay Raut on Congress: आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधान करायचा होता! काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर संजय राऊतांचा 'रोखठोक' टोला, बिहारचाही आरसा दाखवला

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget