एक्स्प्लोर
काँग्रेसवाले आता म्हणताहेत राज ठाकरेंच्या सभा घ्या, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा
यावेळी राज ठाकरे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले की, मोदी सरकार जावं ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भूमिका आहे. मी अनेकदा या विषयी त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना लोकसभेत रस नाही, विधानसभा मात्र ते लढविणार आहेत

बारामती : राज ठाकरे यांना लोकसभा निवडणुका लढविण्यात रस नाही. मात्र ते या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींच्या विरोधात सभा घेणार आहेत. लोकसभेसाठी मनसेला आघाडीत घेण्याविषयी काँग्रेस उत्सुक नव्हती. मात्र आता काँग्रेसवालेच सांगताहेत की राज ठाकरेंची सभा घ्या, असा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
VIDEO | प्रत्येक प्रश्नाला नेमकी उत्तरे, शरद पवारांची 'पवार'फुल' मुलाखत | भाग 1 | विचारसंहिता | एबीपी माझा
'विचारसंहिता' या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमांतर्गत एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी शरद पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर दिलखुलास उत्तरे दिली.
यावेळी राज ठाकरे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले की, मोदी सरकार जावं ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भूमिका आहे. मी अनेकदा या विषयी त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना लोकसभेत रस नाही, विधानसभा मात्र ते लढविणार आहेत. ते जर मोदींच्या विरोधी मतप्रवाह तयार करत असतील, तर त्यांची मदत होऊ शकते. ते स्वतंत्र भूमिका ठेवतील. म्हणून त्यांच्याशी सुसंवाद ठेवला, असे पवार म्हणाले.
ठाकरे यांनी काही लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहोत, असे सांगितले आहे. म्हणून आम्ही काही सूचना दिल्या आहेत. काँग्रेस राज ठाकरेंबाबत अनुकुल नव्हती, मात्र आता तेच सांगताहेत की राज ठाकरेंची सभा घ्या. राज ठाकरेंना सोबत घ्यायला हवं होतं, असंही पवार म्हणाले.
मी माढ्यातून लढणार नव्हतो, विजयसिंह मोहितेंना लढवायचं होतं : शरद पवार
माढ्याची जागा सुरुवातीपासून आमच्याकडे आहे. ही जागा आणण्यासाठी अधिक काळजी घ्यावी म्हणून मी केवळ तिथून निवडणूक लढवणार असे सिग्नल देत होतो. मात्र मी तिथून लढणार नव्हतो. तसा माझा विचार नव्हता. आम्हाला विजयसिंह मोहितेंना तिथून लढवायचं होतं. मात्र त्या मतदारसंघात बाकीच्या 5 विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या नावाला विरोध होता. मात्र इथला उमेदवार हा त्यांच्या सहकार्याने दिला असता, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले.
अहमदनगरच्या जागेच्या वादावरून बोलताना ते म्हणाले की, अहमदनगरच्या जागेविषयी काँग्रेसचे जे राज्यातील अन्य घटक होते ते आम्हाला सांगायचे की इथे तुमची ताकत जास्त आहे. ही जागा नेहमी राष्ट्रवादीने जिंकलीय, असे पवार यांनी सांगितले. अहमदनगरचा संघर्ष माझ्यामुळे नाही झाला. त्यावेळी राजीव गांधींनी ही जागा जिंकायचीय असं मला सांगितलं होतं, म्हणून मी लढलो आणि त्यावेळी जिंकलो. यावेळीही मी त्यांचं नावही घेतलं नव्हतं, असे पवार यांनी विखे पाटलांचे नाव न घेता सांगितलं. अहमदनगरचं गणित स्पष्ट आहे. राष्ट्रवादीकडे मत जास्त होती. हे माझ्या सहकाऱ्यांचा सामूहिक मत होतं, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला, असे ते म्हणाले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र




















