एक्स्प्लोर
Advertisement
'गोपीचंद पडळकरांना मदत करा', राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा मोबाईल हॅक करुन फोन केले
पाटील यांचा मोबाईल क्रमांक हॅक करून 'आपणास गोपीचंद पडळकर यास मदत करायची आहे,' असा खोटा संदेश दिला आहे. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज जनार्दन पाटील यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मोबाईल क्रमांक हॅक करुन त्याच्या मोबाईल क्रमांकवरून सांगली लोकसभा मतदार संघात अपप्रचार केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. जयंत पाटील यांनी सोमवारी रात्री इस्लामपूर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे. कार्यकर्ते आणि मतदारांनी या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सांगली लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांचा मोबाईल क्रमांक हॅक करून 'आपणास गोपीचंद पडळकर यांस मदत करायची आहे,' असा खोटा संदेश दिला आहे. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज जनार्दन पाटील यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
पाटील यांनी माजी सभापती दत्ताजी नीलकंठ पाटील यांच्याशी संपर्क केला असता अशा प्रकारचे फोन या मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांना केले असल्याचे निदर्शनास आले आहे. पाटील यांनी सोमवारी रात्री इस्लामपूर पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली असून इस्लामपूर पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधी गुन्हा दाखल केला आहे.
फेक कॉलर अपवरून माझा मोबाईल क्रमांक हॅक करून हा खोडसळपणा केला आहे. मी या खोडसाळपणाचा निषेध करतो. कार्यकर्ते आणि मतदारांनी या खोडसाळपणावर विश्वास ठेवू नये असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
फॅक्ट चेक
क्राईम
Advertisement