(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अजित पवारांनी ठोकला शड्डू! बारामतीत काका पुतण्या भिडण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, आणखी कोणाला मिळाली उमेदवारी?
NCP Candidate List: अजित पवारांची बारामतीतून उमेदवारी जाहीर झाली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली, त्यामध्ये महत्त्वाच्या जागांवर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
बारामती: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. सर्वात हाय होल्टेज निवडणूक होणार असलेला आणि राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. अजित पवार या मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आज आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. अजित पवारांसोबत गेलेल्या पहिल्या नेत्यांचा पहिल्या यादीमध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांना परळीतून दिलीप वळसे पाटील यांना आंबेगाव मधून आशुतोष काळे यांना कोपरगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
अजित दादा 28 तारखेला बारामती मधून उमेदवारी भरणार
लोकसभेनंतर आता विधानसभेला देखील बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार अशीच लढत होईल, अशी चिन्हे आहेत. काल(मंगळवारी) बोलताना सुप्रिया सुळे यांनी त्याबाबत संकेत दिल्याच्या चर्चा होत्या. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या उमेदवारी बद्दलची संदिग्धता आता संपली आहे. 28 तारखेला बारामती मधून उमेदवारी भरणार आहेत. तर दुसरीकडे त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हेच विरोधातील उमेदवार असतील अशा चर्चा आहेत. बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार हेच निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे. अजित पवारांचा मतदारसंघाच प्रचार सुरू झाला आहे. युगेंद्र पवार देखील गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघात अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
पुणे जिल्ह्यातील या जागांवर विद्यमान आमदारांना संधी
बारामती- अजित पवार
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
खेड आळंदी - दिलीप मोहिते पाटील
इंदापूर- दत्तात्रय भरणे
पिंपरी- अण्णा बनसोडे
मावळ- सुनील शेळके
जुन्नर- अतुल बेनके
हडपसर- चेतन तुपे
पहिली एकूण 38 नावांची यादी जाहीर
बारामती- अजित पवार
येवला- छगन भुजबळ
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
कागल- हसन मुश्रीफ
परळी- धनंजय मुंडे
दिंडोरी- नरहरी झिरवाळ
अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम
श्रीवर्धन- आदिती तटकरे
अंमळनेर- अनिल भाईदास पाटील
उदगीर- संजय बनसोडे
अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
वाई- मकरंद पाटील
सिन्नर- माणिकराव कोकाटे
खेड आळंदी - दिलीप मोहिते पाटील
अहमदनगर शहर- संग्राम जगताप
इंदापूर- दत्तात्रय भरणे
अहमदपूर- बाबासाहेब पाटील
शहापूर- दौलत दरोडा
पिंपरी- अण्णा बनसोडे
कळवण- नितीन पवार
कोपरगाव- आशुतोष काळे
अकोले - किरण लहामटे
वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
चिपळूण- शेखर निकम
मावळ- सुनील शेळके
जुन्नर- अतुल बेनके
मोहोळ- यशवंत माने
हडपसर- चेतन तुपे
देवळाली- सरोज आहिरे
चंदगड - राजेस पाटील
इगतुरी- हिरामण खोसकर
तुमसर- राजे कारमोरे
पुसद -इंद्रनील नाईक
अमरावती शहर- सुलभा खोडके
नवापूर- भरत गावित
पाथरी- निर्णला विटेकर
मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला