एक्स्प्लोर

Punjab Election 2022 : जर 60 आमदार निवडून आले नाहीत तर मुख्यमंत्री कसा होणार? सिद्धूंचा खडा सवाल

पंजाबमध्ये चरणजीत सिंह चन्नी यांनाच पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषीत करण्यात आले आहे. मात्र, यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांचा गट नाराज असल्याचे बोलले जात आहे.

Punjab Election 2022 : सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. अशातच पंजाबमध्येही राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यात आला आहे. विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनाच पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषीत करण्यात आले आहे. मात्र, यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांचा गट नाराज असल्याचे बोलले जात आहे. सिद्धू हे देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे. कारण सिद्धू यांनी याबाबत एक वक्तव्य केले आहे. जर 60 आमदार निवडून आले नाहीत तर मुख्यमंत्री कसा होणार? असा सवाल सिद्धू यांनी केला आहे.

चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या काँग्रेस पक्षाच्या निर्णयावर नवज्योत सिंह सिद्धू खूश नसल्याचे दिसत आहे. तुम्हाला 60 आमदार मिळतील की नाही हे पंजाबची जनता ठरवेल, असे सिद्धू यांनी म्हटले आहे. 60 आमदार जिंकून आले नाहीत तर मुख्यमंत्री कसा होणार? असा सवाल सिद्धू यांनी उपस्थित केला आहे. एक गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे की राजकारणात काहीही ठरवले जात नाही असेही ते म्हणाले. सिद्धू यांनी यापूर्वी हायकमांडच्या निर्णयावर ठाम असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे सिद्धू नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. अखेर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विद्यामान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या डोक्यावर हात ठेवला आहे. या पदासाठी चन्नी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू या दोघांमध्ये चुरस असल्याचे पाहायला मिळाले होते. पण अखेर चन्नी यांच्या नावाची हायकमांडने घोषणा केल्याने सिद्धू गट नाराज झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहऱ्याची घोषणा केल्यानंतर नवज्योत सिंह सिद्धू यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हायकमांड नाही तर पंजाबची जनता घेतील, असा दावा सिद्धू यांनी केला होता. सिद्धू यांच्या या विधानावरुन विरोधीक त्यांच्यावर टीका करत आहेत.

दरम्यान, पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.  पंजाबमध्ये कॉंग्रेसची लढत ही  प्रामुख्याने आम आदमी पक्ष आणि अकाली दल- बीएसपीच्या युतीशी होणार आहे.  या निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. तर आम आदमी पक्ष बहुमताजवळ जाण्याची शक्यता आहे.  कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पंजाब लोक कॉंग्रेसने भारतीय जनता पक्षाशी युती केली आहे. एबीपी माझाच्या सी वोटर सर्व्हेमध्ये वरील अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्व्हेनुसार या निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा झटका बसला आहे. कॉंग्रेसला 117 जागांपैकी 24 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला 55 ते 66 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अकली दल महायुतीला 20 आणि 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला तीन ते 11 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
Nagpur BJP: मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
Shani Dev: अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
Inflation Essential Commodities: 42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
Embed widget