Punjab Assembly Election 2022 : मुख्यमंत्री पदासाठी चन्नी यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर सिद्धू नेमकं काय म्हणाले?
विद्यामान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचे नाव पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदासाठी जाहीर केले आहे. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Punjab Assembly Election 2022 : पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान होत आहेत. आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रिपदाची घोषणा केल्यानंतर आता काँग्रेसनेही मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याची घोषणा केली आहे. चरणजीत सिंह चन्नी यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर केले आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी रविवारी ही घोषणा केली. चन्नी यांना पंजाबमध्ये काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सिद्धू म्हणाले की, पंजाब मॉडेलची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी चन्नी यांच्यावर आहे. सिद्धू पंजाबच्या पाठीशी उभा आहे आणि यापुढेही उभा राहणार असल्याचे ते म्हणाले. निर्णय हायकमांडचा होता आणि आम्ही हायकमांडच्या निर्णयाला बांधील असल्याचे सिद्धू म्हणाले.
पक्षाच्या हायकमांडचा प्रत्येक निर्णय मला मान्य असल्याचे त्यांनी सांगितले. पण पंजाब मॉडेलची जबाबदारी आता नवज्योत सिद्धूवर नव्हे तर चन्नी यांच्यावर असल्याचे ते म्हणाले. नवज्योत सिद्धूच्या प्रामाणिकपणाला सगळेच घाबरले आहेत. सिद्धू यांनी नियोजनबद्ध पद्धतीने पंजाबची बाजू मांडली आहे. माझी कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही. सिद्धू पुढे म्हणाले की, आधी कर्ज कमी करा, राज्याचा महसूल वाढवा आणि माफिया राजवट संपवा, असे ते म्हणाले. व्यवस्था बदलण्याची ही लढाई असून काँग्रेस पक्ष व्यवस्था बदलण्यास सक्षम असल्याचे सिद्धू म्हणाले. आता सर्व काही लोकांवर अवलंबून आहे. येत्या काही दिवसांत सर्व काही स्पष्ट होईल. मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडण्याचा अधिकार हायकमांडला आहे. आम्ही हायकमांडच्या आदेशाला बांधील आहोत.
गेल्या अनेक दिवसांपासून पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती. अखेर काल (रविवार) काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषीत केला आहे. काँग्रेसकडून विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाची मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषणा करण्यात आली आहे. चन्नी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच असल्याचे पाहायला मिळाले होते. अखेर काँग्रेस हायकमांडने चन्नी यांच्या डोक्यावर हात ठेवला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा केल्यानंतर चन्नी ट्वीट करुन काँग्रेसचे हायकमांड आणि पंजाबच्या जनतेचे आभार मानले आहेत. तसेच त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर चन्नी यांनी सिद्धू यांना मिठी मारल्याचे पाहायला मिळाले.
महत्त्वाच्या बातम्या: