एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Municipal Corporation Elections : नाशिक मनपा निवडणुकीसाठी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध, दोन लाख मतदारांची वाढ
Nashik Municipal corporation elections : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने मतदार याद्यांची प्रसिद्ध केली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दोन लाख मतदारांची वाढ झाली आहे.
Nashik municipal corporation elections 2022 : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नाशिक महापालिका प्रशासनाने मतदार याद्यांची प्रसिद्ध केली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दोन लाख मतदारांची वाढ झाली आहे. आगामी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यंदा ऑफलाईन या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे ऑनलाईन याद्या प्रसिद्ध करणे शक्य न झाल्याने शहरातील सर्व सहा विभागांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या याद्यांवर एक जुलैपर्यंत त्याच्यावर हरकती दाखल होणार असून 9 जुलैला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.
दरम्यान नाशिक मनपा निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यानुसार जवळपास 12 लाख मतदार आहेत. मतदार याद्या ऑनलाइन देखील प्रसिद्ध करण्यात येणार होत्या. मात्र राज्यातील आठ महापालिकांच्या लोड आयोगाच्या वेबसाईटवर असल्यामुळे लाखो नावे त्याच्यावर अपलोड होऊ शकली नाही तरी महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सायंकाळपर्यंत सुरू होते. तरी विभागनिहाय याद्या तयार करून त्या शहरातील सर्व सहा विभागांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या. यामध्ये नाशिक पूर्व विभाग, नाशिक पश्चिम विभाग, पंचवटी विभाग, सातपूर विभाग, नवीन नाशिक विभाग तसेच नाशिकरोड विभाग यांच्या कार्यालयांमध्ये याद्या ठेवण्यात आल्या आहेत.
नाशिक महापालिकेच्या प्रभाग रचनेला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर 31 मे रोजी महिलांसाठी आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली. महिला आरक्षण सोडत काढल्यानंतर त्यावर हरकती मागविल्या होत्या. त्यानुसार, नाशिक महानगरपालिका आरक्षण सोडतीवर 2 जून दोन आणि 6 जूनला 2 याप्रमाणे चार हरकती आल्या होत्या. संबधित आरक्षणाच्या हरकतीवर सुनावणी होऊन त्या फेटाळण्यात आल्यानंतर अंतिम महिला आरक्षण रचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे गुरुवारी (ता.23) प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द झाल्या. याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर ऑफलाईन स्वरुपात यादी महापालिका निवडणूक विभागाने काढली. त्यानंतर शहरातील महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयात प्रारुप याद्या प्रसिध्द करण्यात आल्या.
विभागनिहाय प्रभाग क्रमांक असे
शहरात पंचवटी प्रभाग एक ते आठ, नाशिक पश्चिम 9, 16 आणि प्रभाग 18, सातपूर प्रभाग 10 ते 15, नाशिक पूर्व 17, 19 ते 21, 27 ते 29 , 39, 40 नाशिकरोड 22 ते 26 आणि 41 ते 43, नवीन नाशिक विभाग 30 ते 38 आणि प्रभाग 44 याप्रमाणे प्रभागांच्या प्रारुप मतदार याद्या तेथील विभागीय कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या.
दोन लाख मतदार वाढले!
प्रारुप मतदार याद्यावर उद्यापासून हरकती नोंदविता येणार आहे. येत्या एक जुलैपर्यंत मतदार याद्यावर हरकती नोंदविता येणार आहे. हरकतीवर सुनावणी झाल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. दरम्यान आजच्या यादीनुसार साधारण 12 लाख मतदार आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत साधारण दोन लाख मतदार वाढले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रिकेट
शेत-शिवार
Advertisement