एक्स्प्लोर

राज्यात मुख्यमंत्रिपद अन् नाशिकमध्ये पालकमंत्रिपदासाठी चढाओढ; भुजबळ, महाजन, भुसे शर्यतीत, कुंभमेळ्यामुळे विशेष महत्त्व

Nashik Guardian Minister Post : दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा या पंचवार्षिकमध्ये येत असल्यानं हजारो कोटींची विकासकामे शहरात होणार आहे.

नाशिक : राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण? यावर एक मत होत  नसतानाच, नाशिकमध्ये पालकमंत्री पदासाठी चढाओढ सुरु झाली आहे. मावळते पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), गिरीश महाजन (Girish Mahajan) नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी प्रयत्न करत आहेत. दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा या पंचवार्षिकमध्ये येत असल्यानं हजारो कोटींची विकासकामे शहरात होणार आहे. त्यानिमित्ताने नाशिकचे नाव जागतिक पातळीवर चर्चिले जाणार असल्यानं नाशिकच्या पालकमंत्रीपदाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

नाशिक विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत  यशानंतर प्रत्येक पक्ष आणि मातब्बर नेते आपापल्या पद्धतीने वजनदार मंत्रिपदासाठी लॉबिंग करत आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी महायुतीने 14 जागा लढविल्या होत्या आणि सर्व जागा विजयी झाल्यानं सर्व पक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मुंबई, पुणे  पाठोपाठ महत्वाचे शहर म्हणून नाशिककडे बघितले जात असल्याने नाशिकचा पालकमंत्री होण्यासाठी कायमच रस्सीखेच बघायला मिळते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात छगन भुजबळ यांनी नाशिकचे पालकमंत्री भूषविले आहे. 2014 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पदाची सूत्र देण्यात अली होती.  याच काळात नाशिकमध्ये कुंभमेळा भरला होता. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली कुंभमेळा सुनियोजितपणे पार पडला होता. त्यामुळे शिंदे सरकारच्या काळातच  देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्यावर आगामी 2027 च्या कुंभमेळाची जबाबदारी दिली आहे.

पदाधिकाऱ्यांकडून लॉबिंग 

अडीच वर्षांपूर्वी शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यावेळी नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यात चांगलीच रस्सीखेच झाली होती. अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची पॉवर वापरून दादा भुसे यांना नाशिकचे पालकमंत्री केले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा या तिन्ही पालकमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी आपापल्या पद्धतीने लॉबिंग करत आहेत. नाशिकमध्ये शिवसेनेचे दोन आमदार असतानाही दादा भुसे याना मंत्रिपद देण्यात आले होते. मागील अडीच वर्षात मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली दादा भुसे यांनी आपल्या कामाची मोहर उमटविली आहे. त्यामुळे शिवसेनेलाच पालकमंत्रीपद मिळेल, असा  विश्वास शिवसैनिक व्यक्त करत असतानाच भाजपचे गिरीश महाजन यांनी कुंभमेळा मंत्री आणि पालकमंत्रीपदावर केलेल्या कामाची आठवण करून देत आहेत. 

राष्ट्रवादीचा पालकमंत्रीपदावर अधिकार असल्याचा दावा

नाशिकचे विमानतळ, मुंबई-नाशिक महामागार्वरील उड्डाणपूल अशी विविध कामे छगन भुजबळ यांच्या कारकिर्दीत पूर्णत्वास आल्यानं कुंभमेळाचे नियोजनही त्यांनाच देण्यात यावे, अशी राष्ट्रवादीकडून मागणी होत आहे. यंदाच्या निवडणुकीत 7 जागा जिंकत जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असल्यानं राष्ट्रवादीचा पालकमंत्रीपदावर अधिकार असल्याचा दावाही केला जात आहे.

कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ? 

नाशिकमध्ये यंदा मंत्रिपदासाठी स्पर्धा सुरु आहे. चांदवडचे आमदार राहुल आहेर यांना कॅबिनेट मंत्री करण्याचा शब्द स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत दिला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, देवयानी फरांदे, सीमा हिरे सलग तिसऱ्यांदा विधानसभेत पोहचले आहेत. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे देखील मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत. त्यामुळे यंदा प्रथमच मंत्रिपदासाठी दावेदारी वाढली असून कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आणखी वाचा 

Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
Shivam Dube : 6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्याकडूनही जोरदार धुलाई, मुंबईचा धावांचा डोंगर
शिवम दुबे अन् सूर्यकुमार यादवची बॅट तळपली, मुंबईच्या फलंदाजांकडून गोलंदाजांची धुलाई
Kapaleshwar Mandir : कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
Uddhav Thackeray: विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Jupiter Hospital : पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरूNagpur Chaiwala : नागपुरातील या चहावाल्याला शपथविधीचं आमंत्रणDrumstick rate Baramati : 100 रूपये पावशेरच्या दरानं विकली जातेय शेवग्याच्या शेंगाTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12 PM : 3 डिसेंबर 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
Shivam Dube : 6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्याकडूनही जोरदार धुलाई, मुंबईचा धावांचा डोंगर
शिवम दुबे अन् सूर्यकुमार यादवची बॅट तळपली, मुंबईच्या फलंदाजांकडून गोलंदाजांची धुलाई
Kapaleshwar Mandir : कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
Uddhav Thackeray: विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
शेवग्याच्या वरणासाठी  डिसेंबरभर थांबावं लागणार? शेवगा 600 रुपये किलो! राज्यातील शेतकऱ्यांना फटका
शेवग्याच्या वरणासाठी डिसेंबरभर थांबावं लागणार? शेवगा 600 रुपये किलो! राज्यातील शेतकऱ्यांना फटका
मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 
मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 
IPO Update : 125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Embed widget