एक्स्प्लोर
Advertisement
मोदींच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्राला काय मिळालं?, पुन्हा एकदा शिवसेना ‘अवजड’च
नरेंद्र मोदी सरकारच्या खातेवाटपात शिवसेनेचे अरविंद सावंत यांना अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आलं आहे, त्यामुळं पुन्हा एकदा भाजपनं शिवसेनेची बोळवण केली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय.
नवी दिल्ली : 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर झालं आहे. या खातेवाटपातं महाराष्टाच्या वाट्याला सात मंत्रीपद आली आहे. मोदी सरकारच्या या वाटपात प्रत्येकी भाजपकडे पाच, शिवसेनेकडे एक तर रिपाईकडे एक मंत्रीपद आली आहे.
नरेंद्र मोदी सरकारच्या खातेवाटपात पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे खातं कायम ठेवलं असून वाणिज्य उद्योगट हे खातंसुद्धा देण्यात आलं आहे. तर नितीन गडकरी यांच्याकडील भूपृष्ठ वाहतुकीची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. प्रकाश जावडेकर यांना पर्यावरण आणि वने विभाग पुन्हा देण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्री आहेत. तर अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना मनुष्यबळ विकास, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्रिपद मिळालं आहे.
Exclusive Arvind Sawant | आज साहेब हवे होते, मंत्रीपदाच्या शपथेनंतर अरविंद सावंत यांच्याशी बातचीत | ABP Mjaha
पुन्हा एकदा अवजड उद्योग मंत्रालय देत शिवसेनेची बोळवण
महाराष्ट्रातील मित्रपक्षांना दोन मंत्रीपद देण्यात आली आहे. त्यात रिपाईच्या रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय खातं देण्यात आलं आहे. पण 2019च्या लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकूनही अन्य सहकारी पक्षांच्या तुलनेत मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा एकदा दुय्यम दर्जाचे खाते देऊ केले आहे. यामुळं पुन्हा एकदा भाजपनं शिवसेनेची बोळवण केली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
शिवसेनेच्या वाट्याला पुन्हा अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आलं आहे. अनंत गितेंनंतर यंदा सेना खासदार अरविंद सावंत या मंत्रालयाची जबाबदारी सांभाळतील. गेल्या वेळी गितेंना अवजड उद्योग मंत्रिपद दिल्यामुळे शिवसेनेत नाराजी होती. त्यामुळे पहिल्या दिवशी नाराजीमुळे गीतेंनी आपला पदभार स्वीकारला नव्हता. मोदी सरकारमध्ये शिवसेनेला एकमेव खातं मिळालं. यावेळीसुद्धा शिवसेनेला अवजड मंत्रालय देत बोळवण केली आहे. त्यामुळे शिवसेनेत्या भूमिकेकडे आता सर्वाचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेला मिळालेल्या मंत्रिपदावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
दरम्यान शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी याबाबत कोणतीही नाराजी नसल्याचं सांगितलं आहे. तसेच अवजड उद्योग खातं मिळालं म्हणून आम्ही आकांडतांडव करत नाही आहे. पण जिकडे मेसेज पोहचवायचा आहे तिकडे पोहोचवला आहे. भाजपकडे 310 खासदार आहेत, पंतप्रधानांना देश घडवायचा आहे सर्वात जास्त रोजगार या खात्यात आहे. 2014 ला आम्ही समाधानी नव्हतो असं कोण बोललं होतं? आम्ही देशासाठी कोणतंही खातं मिळालं तरी चांगलं असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली.
VIDEO | सायकलने प्रवास करणारे 'ओदिशाचे मोदी' प्रतापचंद्र सारंगी मंत्रिमंडळात | ABP Majha
केंद्रीय मंत्रीमंडळात महाराष्ट्राच्या वाट्याला काय?
नितीन गडकरी - भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग
प्रकाश जावडेकर - पर्यावरण आणि वने, माहिती आणि प्रसारण
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा
संजय धोत्रे - मनुष्यबळ विकास, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
पियुष गोयल - रेल्वे, वाणिज्य उद्योगट
रामदास आठवले - सामाजिक न्याय
अरविंद सावंत - अवजड उद्योग
महाराष्ट्रातील मंत्र्यांना मिळालेल्या खात्यांचे मंत्री आणि राज्यमंत्री
संरक्षण - राजनाथ सिंह - श्रीपाद नाईक (राज्यमंत्री)
गृह - अमित शाह - किशन रेड्डी/नित्यानंद राय (राज्यमंत्री)
अर्थ आणि कॉर्पोरेट अफेअर्स - निर्मला सीतारमण - अनुराग ठाकूर (राज्यमंत्री)
भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग - नितीन गडकरी - व्ही के सिंह (राज्यमंत्री)
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग - नितीन गडकरी - प्रतापचंद्र सारंगी (राज्यमंत्री)
ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा- रामविलास पासवान - रावसाहेब दानवे (राज्यमंत्री)
दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान - रवीशंकर प्रसाद - संजय धोत्रे (राज्यमंत्री)
सामाजिक न्याय - थावरचंद गहलोत - रामदास आठवले (राज्यमंत्री)
मनुष्यबळ विकास - रमेश पोखरियाल निशंक - संजय धोत्रे (राज्यमंत्री)
पर्यावरण आणि वने - प्रकाश जावडेकर - बाबुल सुप्रियो (राज्यमंत्री)
माहिती आणि प्रसारण - प्रकाश जावडेकर - (राज्यमंत्री)
रेल्वे - पियुष गोयल - सुरेश अंगडी (राज्यमंत्री)
वाणिज्य उद्योग - पियुष गोयल - सोमप्रकाश (राज्यमंत्री)
अवजड उद्योग - अरविंद सावंत - अर्जुन मेघवाल (राज्यमंत्री)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
मुंबई
भारत
महाराष्ट्र
Advertisement