एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Assembly Election 2019 | मनसे विधानसभा निवडणूक लढवणार : सूत्र
मनसे ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे, सोलापूर, पंढरपूर, हिंगोली, औरंगाबादमधून मनसे निवडणूक लढवणार असल्याचं कळतं.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी निवडणुकीत मनसे 100 जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विभाग प्रमुखांची आज (20 सप्टेंबर) 'कृष्णकुंज' इथे बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरेंनी नेत्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.
मनसे ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे, सोलापूर, पंढरपूर, हिंगोली, औरंगाबादमधून मनसे निवडणूक लढवणार असल्याचं कळतं. राज ठाकर यांनी उमेदावारांची यादी मागवली असल्याची माहितीही मिळत आहे.
मात्र मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करण्याचे आदेश राज ठाकरेंनी नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एक ते दोन दिवसात राज ठाकरे आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
आठवडाभरापूर्वी 'कृष्णकुंज' इथे मनसे नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत नेत्यांमध्ये संभ्रम होता. परंतु आजच्या बैठकीत निवडणूक लढवण्याबाबत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणूक लढवण्यावरुन मनसेमध्ये दुमत : सूत्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
राजकारण
राजकारण
Advertisement