शरद पवारांचा मला आशिर्वाद! दोन ठिकाणी दिवाळी पाडवा होतोय याची खंत, 23 तारखेला गुलाल उधणार : दत्तामामा भरणे
पवार कुटुंबीयांनी एकत्र पाडवा साजरा केला असता तर मला जास्त आनंद झाला असता असे वक्तव्य इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दत्तामामा भरणे (Dattatraya Bharne) यांनी केलं.
Dattatraya Bharne : पवार कुटुंबीयांनी एकत्र पाडवा साजरा केला असता तर मला जास्त आनंद झाला असता असे वक्तव्य इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दत्तामामा भरणे (Dattatraya Bharne) यांनी केलं. दोन्ही ठिकाणी दिवाळी पाडवा होतोय याची खंत आहे. असं व्हायला नको होतं असेही भरणे म्हणाले. शरद पवार (Sharad Pawar) साहेबांचा मला कायम आशीर्वाद आहे असेही ते म्हणाले. शरद पवारांना भेटायला जाणार का? यावर प्रश्न विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा जेष्ठ आहेत त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे भरणे म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना दत्तामामा भरणे यांनी इंदापूर विधानसभेची निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. इंदपुरात 23 तारखेला तुम्ही माझ्या गुलालात सहभागी होण्यासाठी येणार असल्याचे भरणे म्हणाले.
अजित पवार यांच्याकडून काटेवाडीत दिवाळी पाडव्याचं आयोजन
प्रत्येक दिवळीला शरद पवार यांच्याकडून बारामतीत दिवाळी पाडव्याचे आयोजन केले जाते. या दिवशी सर्व पवार कुटुंब एकत्र येते. या दिवशी शरद पवार हे लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. यावेळी मात्र अजित पवार यांनी काटेवाडी येथे आपल्या वेगळ्या दिवाळी पाडव्याचे आयोजन केले आहे. दरम्यान, गोविंदबागेत आयोजित करण्यात आलेल्या पाडव्याला शरद पवार यांच्यासोबतच बारामतीचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार हेदेखील उपस्थित आहेत. सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार आणि शरद पवार हे या कार्यक्रमात लोकांच्या शुभेच्छांना शुभेच्छा देत आहेत.
शुभेच्छा देण्यासाठी दोन्हीकडे कार्यकर्त्यांची गर्दी
काही महिन्यांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. त्यानंतर पक्षात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर आता दरवर्षीप्रमाणे होणारा पवार कुटुंबाचा पाडवा देखील आता एकत्र न होता वेगवेगळा पार पडत आहे. पक्षानंतर आता कार्यक्रमातही फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. बारामतीमध्येच शरद पवार आणि अजित पवार दोन वेगवेगळ्या ठिकाणी आपला दिवाळी पाडवा साजरा करत आहेत. काटेवाडीत अजित पवारांचा तर गोविंदबागेत शरद पवारांचा पाडवा उत्सव सुरू आहे. दोन्हीकडे कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करत आहेत. अजित पवार, पत्नी खासदार सुनेत्रा पवार, अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, जय पवार कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करत आहेत.
महत्वाच्या बातम्या: