(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mira Bhayandar Vidhan Sabha : मीरा-भाईंदर विधानसभेत हायुतीला मतदारांचा कौल, भाजपचे नरेंद्र मेहता विजयी
Mira Bhayandar Assembly Constituency Election 2024 : मीरा-भाईंदर विधानसभेत भाजपचे नरेंद्र मेहता यांनी काँग्रेसचे सय्यद हुसेन यांचा पराभव केला आहे.
Mira Bhayandar Vidhan Sabha Election 2024 : मीरा-भाईंदर विधानसभेत भाजपचे नरेंद्र मेहता यांनी काँग्रेसचे सय्यद हुसेन यांचा पराभव केला आहे. या मतदारसंघात यंदा भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली. मीरा-भाईंदर मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे, पण मागील निवडणुकीत शिंदे समर्थक अपक्ष उमेदवार गीता जैन यांनी विजय मिळवला होता. मीरा-भाईंदरची जागेवर काही निवडणुका वगळता आतापर्यंत भाजप वरचढ ठरल्याचं चित्र दिसत होतं. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारराजाने भाजपला कौल नरेंद्र मेहता यांना विजय मिळवून दिला.
मतदारसंघातील जातीय समीकरण
मीरा-भाईंदरमध्ये हिंदी भाषिक मतदारांचे विशेषत: गुजराती, मारवाडी, जैन आणि उत्तर भारतीय मतदारांचे प्राबल्य आहे. यासोबतच हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदाय ही मोठ्या प्रमाणात आहे. या मतदारसंघात भाजपचं वर्चस्व दिसून येतं. पण, गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष आमदार गीता जैन विजयी झाल्या होत्या. शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला पोहोचलेल्या नेत्यांमध्ये गीता जैन यांचाही समावेश होता.
याआधीच्या निवडणुकांचा निकाल
मीरा-भाईंदर मतदारसंघात 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गिल्बर्ट मेंडोंका हे विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांनी 62013 मताधिक्याने विजय मिळवला होता. 2014 मध्ये भाजपच्या नरेंद्र मेहतानी पुन्हा भारतीय जनता पार्टीचा गड काबीज केला, त्यांना 91468 मते मिळाली. तर 2019 मध्ये गीता जैन यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला, त्यांना 79,527 मते मिळाली होती.
मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील 2024 चा निकाल
- नरेंद्र मेहता (भाजप)
- सय्यद मुजफ्फर हुसेन (काँग्रेस) - विजयी
मीरा-भाईंदर विधानसभा निवडणूक 2019 चा निकाल
- गीता जैन (अपक्ष) - 79575 मते (विजयी)
- नरेंद्र मेहता (भाजप) - 64049 मते
- सय्यद हुसेन (काँग्रेस) - 55939 मते
मीरा-भाईंदर विधानसभा निवडणूक 2014 चा निकाल
- नरेंद्र मेहता (भाजप) - 91468 मते (विजयी)
- गिल्बर्ट मेंडोंका (राष्ट्रवादी काँग्रेस) - 59176 मते
- याकुब कुरेशी (काँग्रेस) - 19489 मते