एमआयएमचे 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, असदुद्दीन ओवेसींनी जाहीर केली नावं, इम्तियाज जलील यांच्यासह...
Chhatrapati Sambhajinagar: आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर एमआयएमकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली होती. इम्तियाज जलील यांच्यासह आणखी 4 जणांची नावं घोषीत करण्यात आली आहेत.
Chhatrapati Sambhajinagar: राज्यात विधानसभा निवडणूकांसाठी (Vidhansabha election) बहुतांश पक्षांकडून हळूहळू उमेदवारांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय वर्तुळात विधानसभेचे वारे वाहत असून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. एमआयएमने एकीकडे महाविकास आघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आता विधानसभेसाठी 5 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहेत. यात इम्तियाज जलील यांच्यासह आणखी ४ उमेदवार आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घोषणा केली आहे.
आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर एमआयएमकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली होती. बीड, परळीसह इतर जिल्ह्यांमधून MIM च्या नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. संभाव्य उमेदवारांच्या याद्या सुरु केल्या होत्या. दरम्यान, MIM ने महाविकास आघाडीला सामील होण्यासाठी प्रस्ताव दिला होता. सप्टेंबर मध्यापर्यंत निर्णय न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशाराही देण्यात आला होता.
कोणत्या उमेदवारांना उतरवले रिंगणात
विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर MIM पक्षाची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद झाली. यात MIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी एकूण 5 उमेदवारांची घोषणा केली असून उरलेल्या उमेदवारांची यादी नंतर जाहीर करणार असल्याचं सांगितलंय. या पाच उमेदवारांमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्यासह धुळ्यातून फारूक शाह , मालेगावचे मुक्ती इस्माईल, मुंबईतून रईस लष्करीया, सोलापूरचे फारूक शाब्दी यांच्या नावाची घोषणा केली आहे.इतर विधानसभा मतदारसंघातून कोणत्या उमेदवारांची निवड केली हे नंतर जाहीर करणार असल्याचं ओवेसींनी सांगितलं.
ओवेसींची पंतप्रधानांसह सरकारवर कडवी टीका
ओवेसींनी विधानसभा निवडणूकीसाठी ५ उमेदवारांची घोषणा करत पंतप्रधानांसह सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले,'१० वर्षात भाजपने जे नियम बनवले की त्याचा परिणाम आणि नुकसान हे मुस्लिमांना होतो. तीन तलाक कायद्याच्या नियमाने शिक्षा दिल्यानंतर कुणी कसे जेल मध्ये राहून बायकोला पैसे देणार.हे फक्त मुस्लिमांना त्रास देण्यासाठी बनवले. मोदी आणि आमित शहा यांनी एव्हडी घान तयार केली पाच वर्षापासून मुस्लिम, इसाई आणि आदिवासी सडत आहे. मला भीती आहे की या सप्टेंबर मध्ये सेंसेंस काम करणार यावेळी NPA NRC काम सुरू होणार आणि नंतर आपल्याला पुरावे मागितले जाणार.तुमचे पूर्वज कुठ जन्मले असे विचारले जाणार.आसाम मध्ये २८ पेक्षा अधिक पेक्षा मुस्लिमांना दोन वर्षात जेलमध्ये राहणार, असेही ते म्हणाले.
हेही वाचा:
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता, मंत्री छगन भुजबळ यांचे सूतोवाच