(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar: शिवसेनेला मिळणार तितकीच मंत्रीपद राष्ट्रवादीला मिळण्याची मागणी; अजित पवारांच्या दिल्लीवारीचं कारण आलं समोर, वाचा एबीपी माझाचा रिपोर्ट
Ajit Pawar: मुंबईत शपथविधीची जय्यत तयारी सुरू असताना अजित पवार दिल्लीत का गेले याबाबतची चर्चा आहे, मात्र, अजित पवारांची दिल्ली वारी कशासाठी याची माहिती एबीपी माझाच्या हाती आली आहे.
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील 24 ते 48 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कारण, महाराष्ट्रात सरकार स्थापनेची कसरत आता दिल्लीत सुरू झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत अनेक घडामोडी सुरू आहेत. अशातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री नेत्यांच्या आणि आपल्या पक्षांच्या आमदारांच्या भेटी नाकारत आहेत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) दिल्लीत पोहोचले आहेत. मुंबईत शपथविधीची जय्यत तयारी सुरू असताना अजित पवार (Ajit Pawar) दिल्लीत का गेले याबाबतची चर्चा आहे, मात्र, अजित पवारांची दिल्ली वारी कशासाठी याची माहिती एबीपी माझाच्या हाती आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांनी (Ajit Pawar) स्ट्राइक रेटच्या आधारे मंत्रीपद वाढवून हवी असल्याच्या मागणीसाठी भाजप श्रेष्ठींना भेटण्यासाठी दिल्ली वारी केल्याचं समजतंय.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दिल्ली वारीचं कारण एबीपी माझाच्या हाती आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या स्ट्राइक रेटच्या आधारे मंत्रीपद वाढवून हवी आहेत. जेवढी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तेवढीच राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाला मंत्रिपद मिळावीत अशी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाची भूमिका आहे. दिल्लीतील भाजप श्रेष्ठींना भेटून मंत्रीपद वाढवण्याच्या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अजित पवार सध्या दिल्लीत आहेत. मात्र, अद्याप अमित शाह यांच्या भेटीसाठी अजित पवार (Ajit Pawar) वेटिंगवर आहेत. मंत्रीपदाच्या वाटपात एखादी जागा कमी आली तरी चालेल. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बरोबरीने जागा मिळायला हव्यात अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेला आणखी जागा लढवल्या असत्या, तर नक्कीच आमदारांची संख्या देखील वाढली असती. राष्ट्रवादीच्या नेत्यांशी अधिकच्या मंत्रिपदांची मागणी करण्याची भूमिका आता अजित पवारांनी घेतली आहे. अजित पवार (Ajit Pawar) दिल्लीत भाजप श्रेष्ठींना भेटण्यासाठी गेल्याने चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता त्यांच्या दिल्ली वारीचं कारण एबीपी माझाच्या हाती आलं आहे. शिवसेनेला जितक्या जागा मिळतील तितक्याच राष्ट्रवादी काँग्रेसला देखील मिळाव्या अशी राष्ट्रवादीची मागणी आहे.
अमित शाहांच्या भेटीसाठी अजित पवार अद्याप वेटिंगवर
अजित पवार (Ajit Pawar) आपल्या मागणीसाठी दिल्लीत भाजप श्रेष्ठींना भेटण्यासाठी गेले असले तरी अद्याप ते वेटिंगवर आहेत, अशी माहिती समोर आली आहे. अमित शाह चंदीगडला रवाना झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जागावाटप आणि मंत्रिमंडळ यामध्ये पेच निर्माण झाला होता. त्याबाबत चर्चा सुरू होत्या, राज्यात एकीकडे ही शपथविधीची तयारी सुरू असतानाच अजित पवार यांनी दिल्लीला गेल्याने राज्यात उलट सुलट चर्चांना उधाण आलं. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडाभर उलटला तरी देखील अद्याप मंत्री मंडळ बद्दलची चर्चा आणि मंत्रिमंडळ वाटप यांच्या चर्चा सुरूच आहेत, महायुतीत असलेला हा पेच अद्याप कायम आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमचा स्ट्राईक रेट असल्याचं सांगणं आहे. आमच्या जितक्या जागा निवडून आल्यात त्यापेक्षा जास्त जागा लढल्या असतो तर जास्त जागा निवडून आलो असतो. जो फॉर्मुला मंत्रिमंडळ वाटपात वापरला जाणार आहे त्यानुसार आम्हाला शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला समान मिळाला पाहिजेत असं अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे. आपल्या मागणीसाठी ते अमित शाह आणि भाजप श्रेष्ठींनी भेटणार आहेत.