माहीम विधानसभेतून अमित ठाकरेंना उमेदवारी; सदा सरवणकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले एक दिवस फिरुन....
Mahim Vidhan Sabha Nivadnuk 2024: अमित ठाकरे चालत फिरतात, आम्ही चालत-चालत लोकांच्या घरी जातो; प्रश्न समजून घेतो, 24 तास 365 दिवस उपलब्ध असतो, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सदा सरवणकरांचा पहिला वार...
Amit Thackeray vs Sada Sarvankar: राज्यातील प्रतिष्ठीत लढतींपैकी एक लढत म्हणजे, माहीम विधानसभा मतदारसंघाची (Vidhan Sabha Election 2024) लढत. कारण, माहीममधून (Mahim) आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना माहीममधून तिकीट देण्यात आलं आहे. तर, त्यांच्याविरोधात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशातच अद्याप ठाकरे गटाची यादी जाहीर झालेली नसल्यामुळे सर्वांचं लक्ष ठाकरेंच्या भूमिकेकडे लागलं आहे. अशातच अमित ठाकरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या विरोधात रिंगणात असलेल्या सदा सरवणकरांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर बोलताना म्हणाले की, "आम्ही गेली अनेक वर्ष जनतेची सेवा केली आहे. लोकं आमच्यासोबत आहेत, जनतेनं भरभरून प्रेम दिलेलं आहे, शिंदे साहेबांनी तिकीट जाहीर केलेलं आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकांसाठी एक दिवस पुरेसा नसतो, आम्ही माहिमकरांसाठी 24 तास 365 दिवस उपलब्ध असतो. माझ्यावर कोणताही दबाव नाही, लढाई आता होणार आहे, त्यात कोणतीही माघार नाही... राज ठाकरेंचा मुलगा पराभूत झाला, तर आम्ही त्याबद्दल काय सांगणार? हार जीत होत असते.आम्ही ठाकरें कुटुंबियांचा आदर करतो आणि करत राहणार... ठाकरे गटानं उमेदवार जाहीर करावा की नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. पण, जिंकणार तर आम्हीच, आम्हाला विश्वास आहे...", असं सदा सरवणकर म्हणाले आहेत.
अमित ठाकरेंना उमेदवारी मिळाल्यानंतर शीवतिर्थावर जल्लोष
अमित ठाकरेंना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अमित ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थावर कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. दरम्यान, माहीममधून ठाकरे गटाने 2019 ची परतफेड करावी, अशी अपेक्षाही नाही, असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे. तर वरळीचा किनाराही साफ करून देईन, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
ठाकरे गटाकडून माहीममधून 2 नावं चर्चेत...
माहीम विधानसभेसाठी मनसे कडून अमित ठाकरे तर शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता सर्वांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लागलं आहे. माहीमसाठी ठाकरे गटाकडून माहीमचे विभागप्रमुख आणि इच्छुक उमेदवार महेश सावंत आणि माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर हे दोघेजण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. प्रभादेवी-दादरमध्ये शिवसेनेतील फुटीनंतर महेश सावंत यांनी वेळोवेळी ठाकरे गटासाठी ठाम भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. तर, प्रकाश पाटणकरांचा माहीम भागात दबदबा आहे. त्यामुळे ठाकरेंकडून माहीममध्ये दोघांपैकी कोणाला संधी मिळणार की, माहीममधून ठाकरे पुतण्यासाठी माघार घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :