Mahim Vidhan Sabha Nivadnuk 2024 : अमित ठाकरेंविरोधात काका उद्धव उमेदवार देणार? 'या' दोन नावांची जोरदार चर्चा
यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे, आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मनसेकडून अमित ठाकरेंना (Amit Thackeray) निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे.
Amit Thackeray vs Sada Sarvankar: आगामी विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Nivadnuk 2024) अत्यंत चुरशीची ठरणार आहे. यंदाची निवडणूक राज्यातील पक्षफुटीनंतरची पहिली निवडणूक आहे. त्यामुळे यंदा राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) अशी लढत पाहायला मिळणार आहे. अशातच सर्वच पक्षांनी आपल्या याद्या जाहीर केल्या आहेत. अशातच यंदाच्या विधानसभेत (Vidhan Sabha Election 2024) मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. पक्षानं आपल्या काही उमेदवारांची नावं जाहीर करुन टाकली आहे.
यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे, आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मनसेकडून अमित ठाकरेंना (Amit Thackeray) निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. तर, शिंदेंकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) निवडणूक लढवणार आहेत. अशातच आता सर्वांचं लक्ष ठाकरेंकडे लागलं आहे. ठाकरे पुतण्याविरोधात उमेदवार देणार की, आपली हक्काची जागा मित्रपक्षांना सोडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अमित ठाकरेंपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरे 2019 मध्ये पहिल्यांदा 2019 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता. आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवलेले पहिले व्यक्ती होते. 2019 च्या निवडणुकीत, ज्यावेळी आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी काका राज ठाकरे यांनी मात्र वरळीतून उमेदवार उभा केला नव्हता. अशातच आता उद्धव ठाकरेंचे पुतणे अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अद्याप ठाकरे गटाकडून यादी जाहीर करण्यात आलेली नाही. अशातच ठाकरे गटाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
माहीम मतदारसंघ म्हणजे, ठाकरेंचा बालेकिल्ला... असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अमित ठाकरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात आता माहीममधून ठाकरे माघार घेणार, कोणताही उमेदवार देणार नाहीत, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. मात्र, दुसरीकडे ठाकरेंकडून दोन नावांची चाचपणी सुरू असल्याची माहिती देखील मिळत आहे. अशातच आज दादर - माहीममध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारीबद्दल आज फैसला होणार आहे. माहीम विधानसभेतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर होणार आहे. त्यानंतर ठाकरे गटाकडून माहीम मतदारसंघाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष ठाकरेंच्या भूमिकेकडे लागलं आहे.
माहीम मतदारसंघासाठी ठाकरेंकडून दोन नावं चर्चेत
माहीम विधानसभेसाठी मनसे कडून अमित ठाकरे तर शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता सर्वांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लागलं आहे. माहीमसाठी ठाकरे गटाकडून माहीमचे विभागप्रमुख आणि इच्छुक उमेदवार महेश सावंत आणि माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर हे दोघेजण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. प्रभादेवी-दादरमध्ये शिवसेनेतील फुटीनंतर महेश सावंत यांनी वेळोवेळी ठाकरे गटासाठी ठाम भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. तर, प्रकाश पाटणकरांचा माहीम भागात दबदबा आहे. त्यामुळे ठाकरेंकडून माहीममध्ये दोघांपैकी कोणाला संधी मिळणार की, माहीममधून ठाकरे पुतण्यासाठी माघार घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
2019 मध्ये पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली होती. वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे यांनी मोठ्या मताधिक्यानं वरळीमधून विजय मिळवला होता. त्यावेळी मनसेनं मात्र, वरळीत उमेदवार दिला नव्हता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकारणापलीकडे कौटुंबिक नातं जपत आपले पुतणे आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे माहीममधून जर अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली, तर ठाकरे गटाकडूनसुद्धा उमेदवार देण्यात येऊ नये, असा एक मतप्रवाह शिवसेना ठाकरे गटात आहे.