एक्स्प्लोर

Mahayuti Seat Sharing : महायुतीत ठिणगी; शिंदेंचे बंडखोर शिलेदार मैदानात, भाजपने उमेदवार घोषित केलेल्या 3 जागांवर शिवसैनिक लढणार

Mahayuti Seat Sharing : महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण भाजपने घोषित केलेल्या जागांवर शिंदे गटाचे बंडखोर निवडणूक लढणार आहेत.

Mahayuti Seat Sharing : महाविकस आघाडीप्रमाणे महायुतीमध्ये देखील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये 3 पक्ष आल्याने इच्छुकांची संख्या मोठी झाली आहे. महाविकास आघाडीत परांडा आणि दक्षिण सोलापूरच्या जागेवर दोन उमेदवार घोषित केलेले असताना आता महायुतीत ठिणगी पडली आहे. भारतीय जनता पक्षाने उमेदवार घोषित केलेल्या जागांवर एकनाथ शिंदेंच्या बंडखोरांनी लढण्याची तयारी केली आहे. 

सोलापुरातील 3 जागांवर शिंदेंचे बंडखोर निवडणुकीच्या मैदानात 

शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या शहर मध्य विधानसभा मतदार संघात भाजपने उमेदवार दिल्याने महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सोलापुरातील तीन मतदार संघात भाजप विरोधात ‘शिवसेनेचे अपक्ष’ म्हणून लढणार आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह एकूण पाच उमेदवार सोलापूर जिल्ह्यातील तीन मतदारसंघात भाजप विरोधात लढणार आहेत. 

सुभाष देशमुख यांच्या विरोधात शिंदेंचे तीन उमेदवार रिंगणात 

शहर उत्तर, शहर मध्य, शहर दक्षिण 3 शिवसेनेचे उमेदवार भाजप विरोधात निवडणुकीत उतरणार असल्याचे सोलापुरातील शिंदेंच्या शिवसैनिकांनी स्पष्ट केलं आहे. शहर उत्तरमध्ये भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख विरोधात शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे अपक्ष फॉर्म भरणार आहेत. शहरमध्य विधानसभेत भाजपच्या देवेंद्र कोठे विरोधात शिंदे गटाचे मनोज शेजवाल रिंगणात उतरणार आहेत. तर दक्षिण सोलापुरात भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांच्या विरोधात उमेश गायकवाड, अण्णाप्पा सतुबर, देवानंद विटकर हे तीन शिवसेना नेते लढणार आहेत. हे पाच ही उमेदवारी शनिवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. आता याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणता तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

महाविकास आघाडीतही परांडा आणि दक्षिण सोलापूरच्या जागेवर वाद सुरु आहे. कारण परांडा आणि दक्षिण सोलापूरच्या जागेवर उद्धव ठाकरेंनी उमेदवार घोषित केलेला असताना आता पवारांच्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेस उमेदवार घोषित केले आहेत. उद्धव ठाकरेंनी दक्षिण सोलापुरात अमर पाटील यांना उमेदवारी दिली होती. तिथे काँग्रेसने दिलीप माने यांना उमेदवारी दिली आहे. तर परांड्यात ठाकरेंनी रणजीत पाटील यांना तिकीट दिले होते. या जागेवर शरद पवारांनी राहुल मोटेंनी उमेदवारी दिली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

MahaVikas Aghadi Seat Sharing : महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता, ठाकरेंनी उमेदवार घोषित केलेल्या जागांवर काँग्रेस अन् शरद पवारांनी नवा चेहरा उतरवला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasant Deshmukh : मोठी बातमी : जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना जामीन मंजूर, 24 तासांत सुटका
मोठी बातमी : जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना जामीन मंजूर, 24 तासांत सुटका
Vishal Patil : 'मी पतंगराव कदमांना खूप त्रास दिला, पण विश्वजित यांच्याकडे उडी मारल्यानंतर..' विशाल पाटील जाहीर कबूली देत काय म्हणाले?
'मी पतंगराव कदमांना खूप त्रास दिला, पण विश्वजित यांच्याकडे उडी मारल्यानंतर..' विशाल पाटील जाहीर कबूली देत काय म्हणाले?
भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; राम सातपुतेंना उतरवलं, नुकतेच प्रवेश केलेल्या नेत्यालाही संधी
भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; राम सातपुतेंना उतरवलं, नुकतेच प्रवेश केलेल्या नेत्यालाही संधी
Baramati Vidhan Sabha: बारामतीच्या लोकांना लोकसभेला चूक केल्यासारखं वाटतंय, आता अजितदादाच जिंकणार: सुनेत्रा पवार
बारामतीच्या लोकांना लोकसभेला चूक केल्यासारखं वाटतंय, आता अजितदादाच जिंकणार: सुनेत्रा पवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane : महायुतीचा 160 जागांवर विजय होईल, नारायण राणेंना विश्वासHasan Mushrif Kolhapur : कागलमध्ये हसन मुश्रीफांचं उमेदवारी अर्ज भरण्याआधी शक्तिप्रदर्शनAmit Thackeray File Nomination : पहिल्यांदा विधानसभा लढवणार. अर्ज भरण्यापूर्वी अमित ठाकरे काय बोलले?ABP Majha Marathi News Headlines maharshtra poltics Vidhansabha 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasant Deshmukh : मोठी बातमी : जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना जामीन मंजूर, 24 तासांत सुटका
मोठी बातमी : जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना जामीन मंजूर, 24 तासांत सुटका
Vishal Patil : 'मी पतंगराव कदमांना खूप त्रास दिला, पण विश्वजित यांच्याकडे उडी मारल्यानंतर..' विशाल पाटील जाहीर कबूली देत काय म्हणाले?
'मी पतंगराव कदमांना खूप त्रास दिला, पण विश्वजित यांच्याकडे उडी मारल्यानंतर..' विशाल पाटील जाहीर कबूली देत काय म्हणाले?
भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; राम सातपुतेंना उतरवलं, नुकतेच प्रवेश केलेल्या नेत्यालाही संधी
भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; राम सातपुतेंना उतरवलं, नुकतेच प्रवेश केलेल्या नेत्यालाही संधी
Baramati Vidhan Sabha: बारामतीच्या लोकांना लोकसभेला चूक केल्यासारखं वाटतंय, आता अजितदादाच जिंकणार: सुनेत्रा पवार
बारामतीच्या लोकांना लोकसभेला चूक केल्यासारखं वाटतंय, आता अजितदादाच जिंकणार: सुनेत्रा पवार
Chhagan Bhujbal : कांदेंविरोधात अपक्ष शड्डू ठोकलेल्या समीर भुजबळांना महायुतीचा पाठींबा? छगन भुजबळांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या
कांदेंविरोधात अपक्ष शड्डू ठोकलेल्या समीर भुजबळांना महायुतीचा पाठींबा? छगन भुजबळांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या
Hasan Mushrif : मी मुख्यमंत्री नाही, पण उपमुख्यमंत्री होणार! आमच्या राज्यात तीन उपमुख्यमंत्री का होऊ नयेत?
मी मुख्यमंत्री नाही, पण उपमुख्यमंत्री होणार! आमच्या राज्यात तीन उपमुख्यमंत्री का होऊ नयेत? : हसन मुश्रीफ
Maharashtra Politics: बाळासाहेब थोरात यांचे विखे पाटलांना आव्हान, म्हणाले, तुम्ही मर्द होतात तर..
बाळासाहेब थोरात यांचे विखे पाटलांना आव्हान, म्हणाले, तुम्ही मर्द होतात तर..
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांचे कागलमध्ये विराट शक्तीप्रदर्शन, म्हणाले रोहित पवार काय आणि कोणी आलं तरी..!
हसन मुश्रीफांचे कागलमध्ये विराट शक्तीप्रदर्शन, म्हणाले रोहित पवार काय आणि कोणी आलं तरी..!
Embed widget