Maharashtra CM Swearing in Ceremony LIVE Updates : देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे मंत्रालयात दाखल
Maharashtra CM Devendra Fadnavis Oath Taking Ceremony Live Updates: देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला.
LIVE
Background
Maharashtra CM Devendra Fadnavis Oath Taking Ceremony Live Updates: देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. या शपथविधी कार्यक्रमात अजित पवार आणि एकनाथ शिंदे हेदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका अनेकांना देण्यात आल्या होत्या. यात गायक, अभिनेते, अभिनेत्री, उद्योगपती, राष्ट्रीय पातळीवरचे नेते, क्रीडा क्षेत्रातील मोठे चेहरे तसेच देशभरातील नामांकित व्यक्तींचा समावेश होता.
आझाद मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आता देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहतील.
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा, पक्षीय बलाबल 2024 (Maharashtra Assembly party wise seats)
महायुती- 237
मविआ- 49
अपक्ष/इतर - 02
---------------------
एकूण - 288
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा (Maharashtra Partywise seat sharing)
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
अपक्ष- 2
भाजपाला पाठिंबा देणारे मित्रपक्ष आणि अपक्ष
जनसुराज्य शक्ती - 2
युवा स्वाभिमान -1
रासप- 1
अपक्ष - 1 (शिवाजी पाटील- चंदगड)
भाजपचं एकूण संख्याबळ (BJP MLAs in Maharashtra) 132+5 = 137
Maharashtra CM Oath Ceremony : देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे मंत्रालयात दाखल
Maharashtra CM Oath Ceremony : देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे मंत्रालयात दाखल झाले आहेत. मंत्रिमंडळाची पहिली बैठक थोड्याच वेळात पार पडेल. त्यानंतर तिन्ही नेते पत्रकारांना संबोधित करतील.
Devendra Fadnavis Swearing-in Ceremony : अजितदादा उपमुख्यमंत्री होताच पक्ष कार्यालसमोर जल्लोष
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पक्ष कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला.
Devendra Fadnavis Swearing-in Ceremony : वडिलांसह आईचेही नाव घेऊन शपथ घेणारे पहिले मुख्यमंत्री
मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस....
वडिलांसह आईचं नाव घेऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री...
Devendra Fadnavis Swearing-in Ceremony : पाहा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तो क्षण
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तो क्षण
#WATCH | Mumbai: PM Narendra Modi congratulates NCP chief Ajit Pawar on taking oath as Maharashtra Deputy CM
— ANI (@ANI) December 5, 2024
(Source: DD News) pic.twitter.com/ZKT7b1sgzq
Devendra Fadnavis Swearing-in Ceremony : हाच तो क्षण जेव्हा एकनाथ शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्रिदपाची शपथ
एकनाथ शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
#WATCH | Shiv Sena's Eknath Shinde takes oath as Deputy CM of Maharashtra pic.twitter.com/G33WOBOLbw
— ANI (@ANI) December 5, 2024