एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Palghar Result | पक्ष वेगवेगळा, पण खासदारकी फिक्स, राजेंद्र गावितांचा विजय

पालघरमधील जनतेचा मी आभारी असून येथील समस्या आणखी लवकर सोडवण्याचा मी प्रयन्त करेन असं मत राजेंद्र गावीत यांनी व्यक्त केलं आहे.

पालघर : पालघर लोकसभेवर शिवसेनेने भगवा फडकवला असून शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा जवळपास 90 हजार मताधिक्क्याने विजय झाला आहे. राजेंद्र गावित यांनी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा दणदणीत पराभव केला आहे . शिवसेनेच्या राजेंद्र गावितयांना 5 लाख 79 हजार 989 मत मिळाली तर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना 4 लाख 91 हजार 391 मत मिळाली. पालघरमध्ये 12 उमेदवार रिंगणात असून उर्वरित उमेदवारापेक्षा नोटाला तिसऱ्या क्रमांकाची म्हणजे तब्बल 29 हजार 463 मत मिळाली आहे. पालघरमधील जनतेचा मी आभारी असून येथील समस्या आणखी लवकर सोडवण्याचा मी प्रयन्त करेन असं मत राजेंद्र गावीत यांनी व्यक्त केलं आहे. तर पालघरसह महाराष्ट्रातील सर्वच जागांवर जनतेने महायुती वर विश्वास दाखवला असून त्यांला आम्ही पूर्ण करु. तसेच पालघर मधील गुंडगिरी आम्ही मोडून काढली अशा शब्दात राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुजन विकास आघाडीवर टिका केली आहे. Loksabha Result | अभूतपूर्व विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद | कौल मराठी मनाचा | ABP Majha पालघर लोकसभा मतदारसंघात युराजेंद्र गावित यांच्यासाठी युतीने सगळी ताकद पणाला लावली होती. शिवसेना-भाजपची युती झाली त्यावेळी पालघर मतदारसंघ आम्हाला सोडण्याची अट शिवसेनेने ठेवल्याचं बोललं जातं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली होती शिवसेनेनं श्रीनिवास वनगा यांना तिकीट देण्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र ऐन वेळी पोटनिवडणुकीत विजयी ठरलेले भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेनं त्यांना तिकीटही दिलं. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत याठिकाणी भाजपच्या राजेंद्र गावित हे विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला. या पोटनिवडणुकीतील महत्त्वाची बाब म्हणजे 2014 मध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार चिंतामण वनगा याठिकाणी विजयी झाले होते, मात्र पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्या प्रमुख लढत याठिकाणी पाहायला मिळाली होती. 2009 लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांनी भाजपच्या चिंतामन वनगा यांचा पराभव केला होता. मात्र 2014 च्या निवडणुकीत 2009 च्या पराभवाचा वचपा काढत, चिंतामण वनगा याठिकाणी विजयी झाले होते. या निवडणुकीत चिंतामन वनगा यांना 5,33,201 मतं पडली होती. तर बळीराम जाधव यांना 2,93,681 मतं मिळाली होती. विधानसभा मतदारसंघ डहाणू विक्रमगड पालघर बोईसर नालासोपारा वसई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं,  प्रविण दरेकर यांचं महायुतीच्या बाजूनं कल येताच मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं, प्रविण दरेकर यांचं मोठं वक्तव्य
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं,  प्रविण दरेकर यांचं महायुतीच्या बाजूनं कल येताच मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं, प्रविण दरेकर यांचं मोठं वक्तव्य
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Embed widget