Maharashtra Vidhansabha Election : सहा महिन्यात दोनदा पराभव, लोकसभेला पडले आता लोकांकडून विधानसभेलाही झटका
Maharashtra Vidhansabha Election : महाराष्ट्रातील काही नेत्यांना लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही पराभव स्वीकारावा लागलाय.
Maharashtra Vidhansabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhansabha Election) महायुतीने दणदणीत विजय मिळवलाय. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. महायुतीने (Mahayuti) 236 जागांवर विजय मिळवलाय, तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) केवळ 49 जागांवर विजय मिळवता आला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या काही नेत्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होता. यापैकी काही नेत्यांना विधानसभा निवडणुकीतही (Maharashtra Vidhansabha Election) पराभव पत्करावा लागलाय.
राम सातपुतेंचा सहा महिन्यात दोनदा पराभव
राम सातपुते यांनी सहा महिन्यांपूर्वी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी त्यांचा 74 हजार मतांनी पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राम सातपुते यांनी माळशिरसमधून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांनी त्यांचा पराभव केलाय.
शशिकांत शिंदे यांचाही विधानसभा निवडणुकीत पराभव
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांनी पराभव केला होता. त्यानंतर शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. या विधानसभा निवडणुकीतही शशिकांत शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागलाय.
संजयकाका पाटील यांना दुहेरी धक्का
भाजप नेते संजयकाका पाटील यांना देखील दुहेरी धक्का बसलाय. संजयकाका पाटील यांनी सहा महिन्यांपूर्वी सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होता. या निवडणुकीत त्यांना अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला होता. संजयकाका पाटील यांनी कवठे महांकाळमधून रोहित पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीतही त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय.
यामिनी जाधव यांचाही विधानसभा निवडणुकीत पराभव
शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या यामिनी जाधव यांचाही विधानसभा निवडणुकीत पराभव झालाय. लोकसभा निवडणुकीत त्यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, लोकसभा आणि आता झालेल्या विधानसभा निडवणुकीतही त्यांना पराभव पत्करावा लागलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या