एक्स्प्लोर

सुधीर साळवींना उद्धव ठाकरेंचा फोन, तातडीने मातोश्रीवर बोलावलं, लालबागच्या मेळाव्यापूर्वी मोठ्या घडामोडी

Shivadi Assembly constituency : सुधीर साळवी यांच्या लालबागच्या मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरेंकडून त्यांना फोन करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंनी सुधीर साळवींना थेट मातोश्रीवर बोलावलं आहे.

Shivadi Assembly constituency : शिवडी विधानसभा मतदारसंघात (Shivadi Assembly constituency ) निर्माण झालेला वाद सोडवण्यासाठी स्वत: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरे यांनी सुधीर साळवी (Sudhir Salvi) यांना फोन करुन तातडीनं मातोश्री निवासस्थानी बोलावलं आहे. दुसरीकडे लालबागमध्ये साळवींच्या समर्थनार्थ मोठी गर्दी जमली आहे. सुधीर साळवी आणि माजी नगरसेवक हे मेळाव्यापूर्वी मातोश्रीच्या दिशेनं रवाना झाले आहेत.

शिवडी विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी यांना उमेदवारी 

शिवडी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अजय चौधरी हे शिवडीचे विद्यमान आमदार आहेत. दरम्यान, शिदेंनी ठाकरेंविरोधात भूमिका घेतल्यानंतर अजय चौधरी यांनी कायम उद्धव ठाकरेंची साथ दिली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिवडीमधून इच्छुक असलेल्या सुधीर साळवींना मैदानात न उतरवता पुन्हा एकदा अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

सुधीर साळवींचा आज मेळावा पार पडणार 

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी शिवडीतून ठाकरे गटाकडून लढण्यास इच्छुक होते. मात्र, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यांच्याऐवजी शिवडीचे विद्यमान आमदार अजय चौधरी यांनाच मैदानात उतरवण्यात आले होते. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी उमेदवारी नाकारल्यानंतर सुधीर साळवी शुक्रवारी म्हणजे आज (दि.25) संध्याकाळी समर्थकांचा मेळावा घेणार आहेत. दरम्यान, या मेळाव्यापू्र्वी खुद्द उद्धव ठाकरेंनी सुधीर साळवींना फोन केला आहे. अजय चौधरी यांच्याविरोधात बंड होऊ नये, यासाठी स्वत: उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. 

लालबागच्या मार्केटमध्ये पार पडणार सुधीर साळवांचा मेळावा 

सुधीर साळवी गेल्या काही महिन्यांपासून शिवडी विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी तयारी करत होते. गणेशोत्सवादरम्यान, त्यांनी लालबागचा राजाच्या पायाशी सुधीर साळवी यांच्या नावाने भावी आमदार अशी चिठ्ठी ठेवण्यात आली होती,त्यानंतर सुधीर साळवींच्या नावाची जोरदार चर्चा रंगली होती. दरम्यान, निष्ठेच्या मेरीटवर उद्धव ठाकरेंनी अजय चौधरींना मैदानात उतरवलं आहे. सुधीर साळवींनी वेगळा निर्णय घेतल्यास अजय चौधरींविरोधात कडवे आव्हान उभं राहू शकते. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सुधीर साळवींची दिलजमाईची करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Amit Thackeray : माझ्या वडिलांनी त्यांच्या मुलासाठी सभा घेतलेली, माझी माणूस म्हणून अपेक्षा होती.. अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Happy Birthday Raveena : तीन दिग्गज अभिनेत्यांसोबत अफेअर; एकासोबत साखरपुडा पण प्रेमात धोका मिळाल्यावर अभिनेत्री रवीनाचं टोकाचं पाऊल, डिप्रेशनचाही शिकार
तीन दिग्गज अभिनेत्यांसोबत अफेअर, एकासोबत साखरपुडा; प्रेमात धोका मिळाल्यावर अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
Shadashtak Yog : दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 26  ऑक्टोबर 2024 : ABP MajhaVidhansabha File Nomination : अर्ज किया है...देवदर्शन, औक्षण आणि शक्तिप्रदर्शनSpecial Report Worli Vidhan Sabha  : वरळीत हायव्होल्टेज, आदित्य ठाकरे सर्वांना पुरुन उरणार?Special Report Sunil kedar Ramtek Vidhansabha : रामटेकसाठी सुनील केदारांच्या मातोश्री बंगल्याच्या वाऱ्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Happy Birthday Raveena : तीन दिग्गज अभिनेत्यांसोबत अफेअर; एकासोबत साखरपुडा पण प्रेमात धोका मिळाल्यावर अभिनेत्री रवीनाचं टोकाचं पाऊल, डिप्रेशनचाही शिकार
तीन दिग्गज अभिनेत्यांसोबत अफेअर, एकासोबत साखरपुडा; प्रेमात धोका मिळाल्यावर अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
Shadashtak Yog : दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
लोकसभेला भाजपात गेले, विधानसभेला पुन्हा शिवसेनेत; 6 महिन्यांतच गावितांची बदलली भूमिका
लोकसभेला भाजपात गेले, विधानसभेला पुन्हा शिवसेनेत; 6 महिन्यांतच गावितांची बदलली भूमिका
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मोठी बातमी ! दिल्लीतून फोन आला, जिथं आक्रोश होता, तिथं जल्लोष सुरू झाला; दिलीप मानेंची उमेदवारी जाहीर
मोठी बातमी ! दिल्लीतून फोन आला, जिथं आक्रोश होता, तिथं जल्लोष सुरू झाला; दिलीप मानेंची उमेदवारी जाहीर
Embed widget