एक्स्प्लोर

Amit Thackeray : माझ्या वडिलांनी त्यांच्या मुलासाठी सभा घेतलेली, माझी माणूस म्हणून अपेक्षा होती.. अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले? 

Amit Thackeray : मनसेनं अमित ठाकरे यांना मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.त्यांच्या विरोधात सदा सरवणकर आणि महेश सावंत यांचं आव्हान असेल. 

मुंबई : माहीम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवार दिला जाणार नाही अशा चर्चा होत्या. मात्र, काही वेळातच शिवसेनेची पहिली यादी आली. या यादीत माहीममधून आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली. दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळं अमित ठाकरेंपुढं आता दुहेरी आव्हान निर्माण झालं आहे. 

अमित ठाकरे यांनी एबीपी माझाच्या 'ताणे बाणे'  या विशेष कार्यक्रमात या सर्व घटनाक्रमावर भाष्य केलं. माझ्या वडिलांनी त्यांच्या मुलासाठी सभा घेतली होती. त्यामुळं माणूस म्हणून अपेक्षा होती परतफेड होईल. मात्र, जेव्हा त्यांनी आमदार उमेदवार दिला तेव्हा मला आवडलं कारण मला एकटं लढून निवडून यायचं नव्हतं. मी साहेबांना म्हटलं होतं की मी उभा राहतोय त्यासाठी दहा जागांवर तडजोड करायची नाही, असं सांगितलं होतं, असं अमित ठाकरेंनी म्हटलं. तिकडून उमेदवार देणार नाही अशा चर्चा होत्या पण तिकडून उमेदवार  दिला, हे त्यांचं राजकरण आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.  

माहीमची तिरंगी लढत

माहीममध्ये तिरंगी लढत होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर, ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

अमित ठाकरेंच्या रुपानं दुसरे ठाकरे मतदारांसमोर

अमित ठाकरे यावेळी विधानसभा निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून गेल्यावेळी निवडणूक लढवली होती. आता आदित्य ठाकरे  दुसऱ्या टर्मसाठी वरळीतून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या समोर मनसेच्या संदीप देशपांडे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मिलिंद देवरा असतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एकला चलोची भूमिका घेत कोणत्याही राजकीय पक्षासोबत विधानसभा निवडणुकीत युती न करण्याची भूमिका घेतली होती. 

मनसेकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर

मनसेनं उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. मनसेच्या चौथ्या यादीत 5 उमेदवारांचा समावेश आहे. मनसेनं आतापर्यंत 70  उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. 

इतर बातम्या :

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अमित ठाकरे पहिल्यांदा लढत असूनही त्यांच्याविरोधात उमेदवार का दिला? आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
Shadashtak Yog : दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
लोकसभेला भाजपात गेले, विधानसभेला पुन्हा शिवसेनेत; 6 महिन्यांतच गावितांची बदलली भूमिका
लोकसभेला भाजपात गेले, विधानसभेला पुन्हा शिवसेनेत; 6 महिन्यांतच गावितांची बदलली भूमिका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sangali Pattern :नाराजी कायम,  संभाव्य सांगली पॅटर्नचा फटका बसणार?Maharashtra 4th Alliance : महायुती, मविआ, तिसरी आघाडीला पर्याय म्हणून चौथ्या आघाडीची स्थापनाDalit Mahasangh Vastav 98:उत्तम जानकरांना उमेदवारी दिल्यास,दलित महासंघाचा आंदोलनाचा इशाराNaresh Manera Vidhan Sabha 2024 : ओवळा-माजिवडा मतदारसंघात सरनाईक विरुद्ध मणेरा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
Shadashtak Yog : दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
लोकसभेला भाजपात गेले, विधानसभेला पुन्हा शिवसेनेत; 6 महिन्यांतच गावितांची बदलली भूमिका
लोकसभेला भाजपात गेले, विधानसभेला पुन्हा शिवसेनेत; 6 महिन्यांतच गावितांची बदलली भूमिका
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मोठी बातमी ! दिल्लीतून फोन आला, जिथं आक्रोश होता, तिथं जल्लोष सुरू झाला; दिलीप मानेंची उमेदवारी जाहीर
मोठी बातमी ! दिल्लीतून फोन आला, जिथं आक्रोश होता, तिथं जल्लोष सुरू झाला; दिलीप मानेंची उमेदवारी जाहीर
Kagal NCP Rada : कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले; कॉलर पकडत हाणामारी
Kagal NCP Rada : कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले; कॉलर पकडत हाणामारी
Embed widget