एक्स्प्लोर

राहुल नार्वेकरांवर 17 कोटींचं कर्ज, 11 लाखांचं सोनं, चार अलिशान गाड्या, नेमकी किती आहे संपत्ती? 

राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी कुलाबा विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती आणि इतर बाबींचा उल्लेख केला आहे.

Rahul Narvekar wealth : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी कुलाबा विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती आणि इतर बाबींचा उल्लेख केला आहे. या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, राहुल नार्वेकरांच्या नावे 35 कोटी रुपयांची एकूण मालमत्ता आहे. तर त्यांच्या  पत्नीच्या नावे 93 कोटी 53 लाख रुपयांची एकूण मालमत्ता आहे. तसेच राहुल नार्वेकर यांच्यावर 17 कोटी रुपयांचे कर्ज देखील आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

राहुल नार्वेकरांच्या नावे 35 कोटी रुपयांची एकूण मालमत्ता 

राहुल नार्वेकरांच्या नावे 35 कोटी रुपयांची एकूण मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावे 93 कोटी 53 लाख रुपयांची एकूण मालमत्ता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती आणि इतर बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. राहुल नार्वेकर यांच्याकडे  7 कोटी 17 लाख तर पत्नीच्या नावे 8 कोटी 53 लाखांची जंगम मालमत्ता आहे. तर राहुल नार्वेकर यांच्या नावे जवळपास 28 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तर पत्नीच्या नावे 85 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.  

राहुल नार्वेकर यांच्यावर 17 कोटी रुपयांचे कर्ज

राहुल नार्वेकर यांच्यावर 17 कोटी रुपयांचे कर्ज तर 66 कोटी रुपयांचे कर्ज पत्नीवर देखील आहे. राहुल नार्वेकरांकडे चार चारचाकी गाड्या, ज्यात मर्सिडीज बेंझ, इनोव्हा क्रिस्टा, महिंद्रा एक्ययूव्ही आणि फॉर्च्युनर यांचा समावेश आहे. राहुल नार्वेकर यांच्याकडे 160 ग्राम सोनं आहे. ज्याची किंमत जवळपास 11 लाख 68 हजार रुपये आहे. त्यांच्या पत्नीकडे जवळपास 660 ग्राम सोनं असून ज्याची किंमत 48 लाखांच्या घरात आहे. 

नार्वेकरांना उमेदवारी दिल्यामुळं राज पुरोहित नाराज

राहुल नार्वेकर यांच्या उमेदवारीला माजी आमदार राज पुरोहित यांनी विरोध केला आहे. राज पुरोहित आज थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती.  राज पुरोहित बंडखोरी करणार असल्याची चर्चा आहे. 2019 मध्ये राज पुरोहित यांचा पत्ता कट करत भाजपकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता त्यांना दुसऱ्यांदा याच मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे राज पुरोहित हे नाराज झाले आहेत. कुलाब्यासह राज्यातील अनेक ठिकाणच्या मतदारसंघामध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. कारण इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळं प्रत्येक राजकीय पक्षात नाराजी नाट्य मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या:

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीपासून मुंबईपर्यंत भाजपमध्ये बंडाळी; आणखी एक माजी आमदार बंडखोरीच्या तयारीत, फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress Candidate List : दिग्रसच्या जागेसाठी ठाकरे अन् काँग्रेसमध्ये तह, तगडा उमेदवार रिंगणात, मंत्री संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
दर्यापूरच्या बदल्यात दिग्रसची जागा घेतली, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे मैदानात, संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dattatreya Hosabale : हिंदूंच्या एकतेला तोडण्यासाठी अनेक शक्ती काम करतात : दत्तात्रय होसबळेABP Majha Headlines : 11 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha Superfast : विधानसभा सुपरफास्ट : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra Election : ABP MajhaNawab Malik Exclusive:नवाब मलिक मानखूर्द शिवाजीनगरमधून निवडणूक लढण्यावर ठाम,'माझा'कडे भूमिका स्पष्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress Candidate List : दिग्रसच्या जागेसाठी ठाकरे अन् काँग्रेसमध्ये तह, तगडा उमेदवार रिंगणात, मंत्री संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
दर्यापूरच्या बदल्यात दिग्रसची जागा घेतली, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे मैदानात, संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
राजसाहेबांचा चिरंजीव आहे, भाजपची इच्छा असेल तर अमित ठाकरेंना विधानपरिषद किंवा राज्यसभा द्यावी : समाधान सरवणकर
अमित ठाकरेंनी राज्यसभा, विधानपरिषदेचा विचार करावा, सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, सरवणकरांच्या लेकाचा सल्ला 
फेसुबक लाईव्ह करत हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबीयास ठाकरेंचा एबी फॉर्म; पण उमेदवार गुलदस्त्यात
फेसुबक लाईव्ह करत हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबीयास ठाकरेंचा एबी फॉर्म; पण उमेदवार गुलदस्त्यात
Satej Patil :  'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
Embed widget