मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेनं आज जाहीर केलेल्या 15 उमेदवारांच्या यादीत बीड, सोलापूर, जळगाव, जालना, नवी मुंबई आणि धाराशिव जिल्ह्यातून उमेदवार देण्यात आले आहेत.
मुंबई : मनसे राज ठाकरे यांनी यंदाची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असल्याची घोषणा केली होती. तसेच, यंदाच्या निवडणुकीत मनसेकडून (MNS) जास्तीत जास्त उमेदवार, सर्वाधिक उमेदवार देण्यात येतील, असेही त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार, राज्यातल सर्वात प्रथम विधानसभा उमेदवारांची घोषणा राज ठाकरेंच्य मनसेकडून करण्यात आली होती. मनसेकडून पहिल्यांदा 7 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. तर, तिसरी यादी 13 उमेदवारांची आणि 5 अशा एकूण 70 उमेदवारांच्या नावांची घोषणा मनसेकडून करण्यात आली होती. त्यामध्ये, बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडेंच्या परळी विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरेंकडून (Raj Thackeray) अभिजित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता, मनसेनं 15 उमेदवारांची 5 वी यादी जाहीर केली असून मनसेच्या एकूण उमेदवारांची संख्या 85 पर्यंत पोहोचली आहे.
मनसेनं आज जाहीर केलेल्या 15 उमेदवारांच्या यादीत बीड, सोलापूर, जळगाव, जालना, नवी मुंबई आणि धाराशिव जिल्ह्यातून उमेदवार देण्यात आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असलेल्या तानाजी सावंत यांच्या परंडा मतदारसंघातून मनसेनं राजेंद्र गपाट यांना विधानसभेचं तिकीट जाहीर केलंय. तर, कळंब-धाराशिव मतदारसंघातून उद्योजक देवदत्त मोरे यांना तिकीट देण्यात आलं आहे. कळंब-धाराशिव मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून कैलास पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कैलास पाटील हे बंडानंतर ट्रकमध्ये बसून मुंबईला परत आलेले ठाकरेंचं निष्ठावंत आमदार आहेत.
आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाचवी यादी खालीलप्रमाणे....#MNSAdhikrut #विधानसभा_२०२४ pic.twitter.com/SKptGVVLtb
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 26, 2024
परळीत धनंजय मुंडेंविरुद्ध उमेदवार
राज ठाकरे यांनी यंदाची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्या प्रमाणं मनसेनं एकला चलोची भूमिका कायम ठेवली आहे. मनसेकडून पहिल्यांदा 7 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर काल मनसेकडन 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली . आज मनसेनं 13 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. म्हणजेच मनसेकडून आतापर्यंत 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरेंकडून अभिजित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मनसेनं जाहीर केलेली 15 उमेदवारांची यादी
1.पनवेल - योगेश जनार्दन चिले
2.खामगांव - शिवशंकर लगर
3.अक्कलकोट - मल्लिनाथ पाटील
4.सोलापूर शहर मध्य - नागेश पासकंटी
5.जळगाव जामोद - अमित देशमुख
6.मेहकर - भैय्यासाहेब पाटील
7.गंगाखेड - रुपेश देशमुख
8.उमरेड - शेखर दुंडे
9.फुलंब्री - बाळासाहेव पाथ्रीकर
10.परांडा - राजेंद्र गपाट
11.उस्मानाबाद (धाराशिव) - देवदत्त मोरे
12.काटोल - सागर दुधाने
13.बीड - सोमेश्वर कदम
14.श्रीवर्धन - फैझल पोपेरे
15. राधानगरी - युवराज येडुरे