फेसुबक लाईव्ह करत हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबीयास ठाकरेंचा एबी फॉर्म; पण उमेदवार गुलदस्त्यात
मुंबईतील दहिसर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी घोसाळकर कुटुंबीयांना देण्यात आल्याने या मतदारसंघातील चूरस आणखी वाढली आहे.
![फेसुबक लाईव्ह करत हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबीयास ठाकरेंचा एबी फॉर्म; पण उमेदवार गुलदस्त्यात Shivsena UBT UddhavThackeray AB form to Ghosalkar family of dahisar who was assination while doing Facebook live Maharashtra Vidhan Sabha Election 2024 फेसुबक लाईव्ह करत हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबीयास ठाकरेंचा एबी फॉर्म; पण उमेदवार गुलदस्त्यात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/26/8e997867157df11285552f6e5fa56aa117299528564661002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : दहीसरमध्ये काही महिन्यांपूर्वी फेसबुक लाईव्ह करत ज्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, त्या माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीकडे शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे. मात्र, उद्धव ठाकरेंकडून देण्यात आलेला फॉर्म हा घोसाळकर कटुंबीयांसाठी असून तेजस्वी घोसाळकर लढणार की विनोद घोसाळकर मैदानात उतरणार याबाबत लवकरच कुटुबीयांचा निर्णय जाहीर होईल. तेजस्वी घोसाळकर यांच्या उमेदवारीमुळे दहिसरमध्ये (Mumbai) चुरशीची लढत होण्याची शक्यत आहे. कारण, दहिसरमध्ये भाजपाच्या मनिषा चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तेजस्वी घोसाळकर या माजी नगरसेविका असून त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची 8 फेब्रूवारी 2024 ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
मुंबईतील दहिसर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी घोसाळकर कुटुंबीयांना देण्यात आल्याने या मतदारसंघातील चूरस आणखी वाढली आहे. येथील मतदारसंघातून दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी आणि त्यांचे सासरे माजी आमदार विनोद घोसाळकर दोघेही निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मातोश्रीवरुन ठाकरेंनी यंदा तेजस्वी घोसाळकरांना ग्रीन सिग्नल देत त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचं ठरवलं आहे. मात्र, आता हा निर्णय घोसाळकर कुटुंबीयांवर सोपविण्यात आला आहे. तेजस्वी घोसाळकर या माजी नगरसेविका असून त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची 8 फेब्रूवारी 2024 रोजी हत्या करण्यात आली होती. भाजपने या मतदारसंघात यापूर्वीच उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे, यंदा दहिसरमध्ये भाजपच्या मनिषा चौधरी आणि तेजस्वी घोसाळकरांमध्ये लढत होणार असल्याचे दिसून येते. मात्र, अद्याप येथून कोण लढणार हे निश्चित झालं नाही.
उद्धव ठाकरेंकडून घोसाळकर कुटुंबियांना AB फॉर्म सुपूर्द
निवडणूक कोणी लढवायची हे तुम्ही ठरवा. तुमच्या कुटुंबात झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर मला याबाबत काहीही बोलायचं नाही. निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार तुमचा असे म्हणत उद्धव ठाकरेंनी घोसाळकर कुटुंबीयांसमोरच भूमिका मांडली आहे. त्यामुळे, घोसाळकर कुटुंबीय नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दहिसर मतदार संघांची भौगोलिक स्थिती
दहिसर मतदार संघ हा उत्तर मुंबईचा सर्वात शेवटचा मतदार संघ असून मूळचा ठाण्यात असलेला हा मतदार संघ 1956 मध्ये बोरीवली लोकसभा मतदार संघाला जोडला गेला. या लोकसभा मतदार संघामध्ये भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या दांडग्या जनसंपर्काचा फायदा नक्कीच युतीच्या उमेदवाराला होतो. मराठी भाषिक लोक या भागात सर्वात जास्त असून उत्तर भारतीय आणि व्यापारी लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)