जयंत पाटलांनी तानाजी सावंतांविरुद्ध उमेदवार घोषित केला; आता संजय राऊतांनीही स्पष्टच सांगितलं
परांडा (Paranda) हा शिवसेनेचा मतदार संघ आहे. तिथे आमचा आमदार निवडून आलेला आहे. या जागेबाबत 29 तारीख ते 4 नोव्हेंबरपर्यंत आम्ही निर्णय घेऊ शकतो असे खासदार संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : तीन पक्षांनी मिळून, बसून 12-12 तास चर्चा करुन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळं नाराजी कुठेही नसल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. महाविकास आघाडीत जागा वाटप करणे इतकं सोपं नव्हते असेही राऊत म्हणाले. परांडा (Paranda) हा शिवसेनेचा मतदार संघ आहे. तिथे आमचा आमदार निवडून आलेला आहे. या जागेबाबत 29 तारीख ते 4 नोव्हेंबरपर्यंत आम्ही निर्णय घेऊ शकतो. 4 नोव्हेंबर ही अर्ज माघे घेण्याची तारीख आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटानं परांडा मतदारसंघातून रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून राहुल मोटे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
तीन पक्ष सोबत आहेत. त्यामुळं तिढा असणारचं आहे. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असतात. दोन पक्ष असल्यावर ठीक, पण तीन पक्ष असल्यावर प्रत्येकाला वाटत आपणच जागा जिंकणार असे राऊत म्हणाले. महाविकास आघाडीत जागा वाटप करणे इतकं सोप्प नव्हते असे राऊत म्हणाले. दरम्यान, महाविकास आघाडीत काही ठिकाणी जागावाटपाच्या मुद्यावरुन पेच निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची दुसरी यादी आज जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची दुसरी यादी आज जाहीर झाली आहे. प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी उमेदवारांच्या 22 नावांची घोषणा केली आहे. यामध्ये परांडा विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या राहुल मोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान आमदार आणि मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याविरोधात त्यांचा सामना होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिल्या यादीत 45 उमेदवारांच्या नावांचा घोषणा करण्यात आली होती. आद जयंत पाटील यांनी 22 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये अद्यापही काही मतदारसंघातील नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, परांडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा मुलगा रणजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, शरद पवार गटानं या जागेवर दावा केला होता. त्यामुळं ठाकरे गटानं माघार घेतल्याचं बोललं जात आहे. आता परांडा मतदारसंघातून तानाजी सावंत विरुद्ध राहुल मोटे असा सामना होणार आहे.
महत्वाच्या बातम्या: