पुरंदर शत्रूच्या हाती पडता कामा नये, विजयबापू जिंकणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, मुख्यमंत्र्यांना विश्वास
काहीही झालं तरी पुरंदर शत्रूच्या हाती पडता कामा नये. मी सांगितलं होतं पुरंदरचा किल्लेदार विजय शिवतरे (Vijay Shivtare) यांना विधानसभात पाठवा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.
CM Eknath Shinde : काहीही झालं तरी पुरंदर शत्रूच्या हाती पडता कामा नये. मी सांगितलं होतं पुरंदरचा किल्लेदार विजय शिवतरे (Vijay Shivtare) यांना विधानसभात पाठवा. विजयबापूचं विजयाची गुडी उभारणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला, विजय शितारेंच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री पुरंदरमध्ये बोलत होते. कुणी माय का लाल बापूला हरवू शकतो का? बापू जिंकणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
बापू म्हणजे एक घाव दोन तुकडे
बापू नेहमीच लक्षवेधी असतात. बापू म्हणजे एक घाव दोन तुकडे मी त्यांना सांगतो जरा सबुरीने घ्या असेही मुख्यमंत्री म्हणाले. इथले आमदार नावापुरते आहेत का? सगळं बापूच करतात का इथले? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी आमदार संजय जगताप यांच्यावर टीका केली. बापू कधी कधी रागावतो, कधी कधी कुणाला घाम फोडतो असेही ते म्हणाले. विमानतळ शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन केले जाईल. अडीच हजार कोटींची आयटी लॉजिस्टिकसाठी तरतूद केली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विजयबापूंच्या पाठीला माती लावण्यासाठी अनेकजण टपून बसलेत असेही ते म्हणाले.
आमची देना बँक आहे, लेना बँक नाही
लाडक्या बहिणीची योजनेचे पैसे ज्यांच्या खात्यात आले नाहीत, त्यांच्या खात्यात पैसे टाकण्याचं काम एकनाथ शिंदे करणार असल्याचे ते म्हणाले. आमच्या बहिणींनी आमच्या भाऊजींना गळ घालायची लाडक्या बहिणीला त्यांनी पैसे दिल्यात सगळी मतं त्यांना द्यायची. महाविकास आघाडीचे सावत्र भाऊ योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले होते असे मुख्यमंत्री म्हणाले. आमची देना बँक आहे, लेना बँक नाही, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मी स्वतःला cm म्हणजे कॉमन मॅन समजतो. मला कॉमन मॅनला सुपरमॅन बनवायचे आहे. सरकारमधून पाय उतार व्हायला मोठे मन लागते. त्यांनी बाळासाहेबांना नको होतं ते केलं म्हणून आम्ही हे केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. अडीच वर्ष केंद्रासोबत आपण कशाला मागायचं असं म्हणाले. केंद्र सरकार काय घरी येणार होता का द्ययला. आपल्याला गरज लागली तर मागायचं होतं असे मुख्यमंत्री म्हणाले. 2014 ते 2024 दरम्यान 10 लाख कोटी मिळाले आहेत. माझं काय मला काय मिळालं त्यापेक्षा जनतेला काय मिळालं हे बघणारा मुख्यमंत्री पाहिजे असेही ते म्हणाले.
सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा
हे सरकार घरात बसणारं नाही. फेसबुक लाईव्ह करणारं सरकार नाही. फेस टू फेस जाणारं सरकार आहे.
शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून पाच कोटी लोकांनी फायदा घेतला. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा राहील असेही मुख्यमंत्री म्हणाले. सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा आहे. दिवाळी झाली आता नवीन फटाके घेऊन ठेवा 23 तारखेसाठी. गाफील राहू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले. सरकार महायुतीचा येणार ही काळ्या दगडावरचे पांढरी रेघ आहे. पुरंदरचा आमदार माझ्या विचाराचा द्या. एवढं बटन दाबा की विरोधकांसाठी डिपॉझिट जप्त झालं पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले.