वसई, नालासोपाऱ्यात उद्धव ठाकरेंपुढे पेच, पदाधिकऱ्याने थेट अपक्ष म्हणून भरला अर्ज; पदाधिकाऱ्यांची नाराजी कशी दूर करणार?
सध्या विधानसभा निवडणुकीची धूम आहे. मात्र अनेक जागांवर बंडखोरीच्या भूमिकेमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. नालासोपारा, वसई या मतदाररसंघातही अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
पालघर : वसई आणि नालासोपारा (Vasai And Nalasopara) हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला (Congress) सुटल्याने शिवसेना उबाठा (Uddhav Thackeray Shivsena) गटातील पदाधिकारी नाराज झाले आहेत. वसई विधानसभा शिवसेनेची असताना जिल्हाप्रमुखाच्या निष्क्रियतेमुळे ही जागा काँग्रेसला गेल्याचा आरोप करत जिल्हाप्रमुख हटावचा नारा शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विनायक निकम यांनी तर बंडखोरी करत अपक्षाचा अर्जही दाखल केला आहे.
2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) वसईची जागा शिवसेनेला गेली होती. त्यावेळी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करुन शिवसेनेच्या तिकीटावर विजय पाटील यांनी ती निवडणूक लढवली होती. मात्र निवडणूक हरल्यानंतर विजय पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. आता परत विजय पाटील यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे. आता ते काँग्रेसच्या चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. वसईत शिवसेना ठाकरे गटाची ताकद असताना ही जागा काँग्रेसला गेल्याने शिवसैनिक आणि पदाधिकारी कमालीचे संतप्त झाले आहेत. त्यांनी आज वसईच्या शिवसेना शाखेत बैठक घेत, पक्ष जो आदेश देईल तो पाळणार. मात्र जिल्हाप्रमुख आम्हाला नको असा पवित्रा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. जोपर्यंत वरिष्ठ आदेश देत नाहीत, तोपर्यंत माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांच्यावर प्रभारी जिल्हाप्रमुखाची जबाबदारी देण्याचा ठरावही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
बैठकीतील ठाकरे गटाच्या शिवसैनिक पदाधिका-यांची नावे
शिरीष चव्हाण – माजी जिल्हाप्रमुख, पालघर शहर
विनायक निकम – वसई विधानसभा संघटक
मिलिंद खानोलकर – शिवसेना पालघर जिल्हा सचिव
राजाराम बाबर – वसई तालुका प्रमुख
विवेक पाटील – सहसचिव, पालघर जिल्हा
किरण चेंदवणकर – महिला जिल्हा संघटक
संजय गुरव – शहरप्रमुख, नवघर
प्रथमेश राऊत – शहरप्रमुख, वसई
सुनील मुळे – उपतालुकाप्रमुख, वसई
ॲड भरत पाटील – विधी सेना जिल्हाध्यक्ष
ॲड अनिल चव्हाण – पालघर जिल्हासचीव
दरम्यान, ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे विसई-विरारमध्ये हा नवा पेच निर्माण झाला आहे. यावर आता महाविकास आघाडी नेमका कसा तोडग काढणार? उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :